Full Width(True/False)

💁‍♂️ संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन


💁‍♂️ संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन

⚡ कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याबाबतची घोषणा केली. 

👉 पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं. 

💫 यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. तसंच मोदींनी देशातील कोरोनाची स्थिती पाहता देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. 

🗣️ पंतप्रधान म्हणाले : 

▪️ अनेक कष्ट सोसून तुम्ही संकटाशी दोन हात करत आहेत, तुम्हाला सलाम, तुमच्या त्यागामुळेच भारत कोरोनाशी लढत आहे.

▪️ अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात.

▪️ भारतात कोरोना केस सापडण्याआधीच आपण परदेश सीमा बंद केल्या, समस्या वाढण्याची वेळ पहिली नाही, समस्या दिसताच ती थांबवण्याचा निर्णय घेतला.

▪️ इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे.

▪️ भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात.

▪️ लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ, याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचं मोल नाही.

▪️ राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांचं मोलाचं कार्य, कोरोना ज्या वेगाने वाढत आहे, त्याने आर्थिक तज्ज्ञही आवक, लॉकडाऊन वाढवण्यात यावा हा उपाय वारंवार समोर येत आहे.

▪️ भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात येत आहे.

▪️ पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, कठोर पावलं उचलावी लागतील.

▪️ 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, जे क्षेत्र आपलं हॉटस्पॉट वाढू देणार नाहीत, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार करू.