Full Width(True/False)

मोदी सरकार मोठा दिलासा देणार; लॉकडाऊन काळात 'हे' दुकाने, उद्योग सुरु ठेवण्याची मुभा



🔐 कोरोना व्हायरसचे वाढते स्वरूप पाहून 25 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात जाहीर केलेले लॉकडाऊन लॉकडाऊन 14 एप्रिलला संपत आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी लॉकडाऊन वाढविले आहे, मात्र, मोदी सरकारने लॉकडाऊननंतर काय करायचे याचे प्लॅनिंग सुरु केले आहे.

👉 काय सुरु राहणार?

▪️ _टेक्सटाइल, ऑटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग._
▪️ _एक्सपोर्ट कंपन्या, लघुउद्योग._
▪️ _ऑप्टिक फाइबर केबल, टेलिकॉम इक्विपमेंट आणि सुटे भाग_
▪️ _कॉम्प्रेसर और कंडेन्सर युनिट_
▪️ _स्टील आणि फेरस अलॉय मिल_
▪️ _स्पिनिंग आणि जिनिंग मिल, पावर लूम_
▪️ _संरक्षण क्षेत्रातील उत्पादन प्रकल्प_
▪️ _सिमेंट प्रकल्प_
▪️ _लाकूड लगदा आणि कागद निर्मिती प्रकल्प_
▪️ _पेंट आणि डाय उत्पादन_
▪️ _सर्व प्रकरचे खाण्याचे पदार्थ (हॉटेल वगळून)_
▪️ _प्लास्टिक उत्पादन_ 
▪️ _सोन्याची दुकाने, सराफा बाजार_
👉 दुरुस्ती क्षेत्रात काय?

मोबाइल , रेफ्रिजरेटर, एसी, टीव्ही, प्लंबिंग, चप्पल दुरुस्ती, पत्रकार, इलेक्ट्रीशियन, ऑटोमोबाइल मॅकेनिक, साइकल रिपेयर या दुरुस्तीच्या सेवा सुरु ठेवता येतील. यासाठी या लोकांना त्यांच्यासोबत ओळखपत्र ठेवावे लागणार आहे. ते पूर्वीच्याच ठिकाणी काम करू शकणार आहेत.

👉 शेतकऱ्यांसाठी दिलासा

शेतीला आवश्यक असलेल्या सर्व कामांना मंजुरी. यामध्ये कृषी रसायन (खत किंवा कीटकनाशक इ.) उत्पादन, वितरण आणि विक्री (विक्री) यांचा समावेश आहे.