नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपला ए सीरिज अंतर्गत Samsung Galaxy A21s स्मार्टफोन आज लाँच केला आहे. एप्रिलमध्ये लाँच करण्यात आलेल्या मॉडलच्या तुलनेत हा स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy A21s आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी बॅकअप (५००० एमएएच क्षमता) दिला आहे. फोटोग्राफीसाठी चार सेन्सरचा क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. मिड रेंज सेगमेंट लाँच करण्यात आल्यानंतर कंपनीने आता अमोलेड डिस्प्लेचा स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे.
वाचाः मार्केटमध्ये सध्या बजेट स्मार्टफोनच्या तुलनेत या फोनचे फीचर्स दमदार असल्याचे दिसत आहेत. सॅमसंगने या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्याचा टॉप लेफ्ट कॉर्नरवर पंचहोल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. नवीन डिझाईनमध्ये हा फोन आधीच्या Samsung Galaxy A21 या स्मार्टफोन सारखाच आहे. परंतु, यात जबरदस्त कॅमेरा सेटअप, जास्त रॅम पर्याय आणि आधीच्या तुलनेत जास्त बॅटरी दिली आहे. या फोनमधील चिपसेटचे नाव कंपनीने अद्याप उघड केलेले नाही.
वाचाः Samsung Galaxy A21s ची वैशिष्ट्ये सॅमसंगच्या मिडरेंज स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. एचड प्लस रिझॉल्यूशन देण्यात आली आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, सेल्फीसाठी पंचहोलमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. प्रायमरी कॅमेऱ्याच्या सेटअपमध्ये यात ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे.
Samsung Galaxy A21s ची किंमत सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन ४ जीबी रॅम, ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम या पर्यायात उपलब्ध आहे. यात ३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेजचे मॉडेल उपलब्ध आहेत. स्टोरेज वाढवण्याची सुविधा सुद्धा यात देण्यात आली आहे. लेटेस्ट फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड OneUI Core दिला आहे. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि १५ वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हा फोन ब्लॅक, व्हाईट, ब्लू आणि रेड या रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.
या फोनची किंमत २०० युरो म्हणजेच भारतात या फोनची किंमत १६ हजार ५०० रुपये आहे. या फोनची विक्री १९ जूनपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. वाचाः वाचाः