Full Width(True/False)

करोना संसर्गाचा मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम!




संयुक्त राष्ट्रे: करोनाच्या वाढत्या थैमानासमोर जगातील अनेक देश हतबल झाले आहेत. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे करोनाबाधितांसह इतर निरोगी नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सरकार आणि समाजाने पावले उचलण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत असून, यातून मार्ग काढण्यासाठी सरकारे, नागरी समाज आणि आरोग्य प्राधिकरणांनी त्वरित पावले उचलण्याची गरज आहे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गटेरेस यांनी केले. अँटोनिओ गटेरेस यांनी एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. 

यावेळी ते म्हणाले की, 'मानसिक आरोग्य सेवांकडे गेल्या अनेक दशकांमध्ये दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे कोविड-१९च्या साथीचा फटका बसलेली कुटुंबे आणि समुदाय आता मानसिक तणावाचा सामना करीत आहेत. या साथीमध्ये आपल्या प्रियजनांना गमावण्याचे दुःख, रोजगार जाण्याचा धक्का, अलगीकरण आणि लोकांच्या वावरण्यावर आलेले निर्बंध, कुटुंबामधील वाढत्या गुंतागुंती आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता व भय ही वाढत्या मानसिक तक्रारींची कारणे असल्याचे त्यांनी म्हटले. 

वाचा: गटेरेस म्हणाले की, 'जे लोक अधिक धोकादायक स्थितीत आहेत आणि ज्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे, अशांमध्ये पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, वयस्क, तरुण, आधीपासूनच जे मानसिक तक्रारीशी सामना करीत आहेत आणि या साथीने व संकटाने ग्रासले गेले आहेत, अशांचा समावेश आहे. तसेच कोविड-१९च्या संकटाचा सामना करण्याच्या सरकारांच्या उपाययोजनांमध्ये मानसिक आरोग्यसेवांना प्राधान्य असले पाहिजे'. 

from International News in Marathi, World News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dNwqIh