Full Width(True/False)

UGC NET सह अनेक परीक्षा अर्जांना मुदतवाढ

2020: यूजीसी नेट जून 2020, जेएनडब्ल्यूई, आयसीएआर -2020, सीएसआयआर-नेट जून 2020 या परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी ३१ मे २०२० पर्यंत अर्ज करु शकणार आहे. ही मुदत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आज १५ मे रोजी संपणार होती. आयसीएआर - 2020 भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ( - 2020) साठी अर्ज करण्याची तारीख १५ मेपर्यंत वाढविण्यात आली होती. 

आता ती ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. जेएनयूईई जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेएनयूईई ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. यासाठी आता आपण ३१ मे २०२० पर्यंत अर्ज करू शकता. यूजीसी नेट जून 2020 यूजीसी नेट 2020 साठी अर्ज करण्याची तारीख १६ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. ती आता पुन्हा एकवार ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. जॉइंट सीएसआयआर-नेट जून 2020 जॉइंट सीएसआयआर-नेट जून 2020 साठी अर्ज करण्याची तारीख ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. या सर्व परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मे २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. अर्जांचे शुल्क भरण्याची मुदत ३१ मे रोजी रात्री ११.५० वाजता संपणार आहे. 

करोना व्हायरस संसर्गाचा परिणाम कोविड - १९ च्या संक्रमणामुळे देशात सध्या लॉकडाऊन स्थिती आहे. मार्च अखेरपासून हा लॉकडाऊन सुरू आहे. या टाळेबंदीमुळे देशभरात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. स्पर्धा परीक्षांसह सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता सीबीएसई दहावी आणि बारावी, जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड आणि नीट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. १४ मे २०२० रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी शिक्षकांना संबोधित करताना वेबिनारद्वारे यूजीसी नेट परीक्षेबद्दलची माहिती दिली. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तूर्त तरी परीक्षा अर्जांची मुदत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप या किंवा वरील कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज केला नसेल ते या वाढीव मुदतीत अर्ज करू शकतील. येथे संपूर्ण सूचना पहा