Full Width(True/False)

भारताने विश्वविजेत्या खेळाडूची अमेरिकेतून केली सुटका



अमेरिकेत करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारताचे एक विश्वविजेते खेळाडू अमेरिकेत अडकलेले होती. या खेळाडूंची यशस्वीपणे सुटका भारताने केली आहे. आज या विश्वविजेत्या खेळाडूंना खास विमानाने भारतात आणण्यात आले आहे. अमेरिकेमध्ये तर करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये एक भारताचे विश्वविजेते खेळाडू अडकलेले होते. या दिग्गज खेळाडूंची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांनी भारत सरकारकडे मायदेशात येण्याची विनंती केली होती. उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे त्यांना कॅलिफोर्नियामधील एका हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले होते. 

त्याचबरोबर काही अन्य कारणास्तव त्यांची प्रकृती खालावली होती. त्यासाठी भारताने थेट अमेरिकेत त्यांच्यासाठी डॉक्टर पाठवला होता. त्यावेळी त्यांच्यावर काही उपचार करण्यात आले होते. सध्याच्या घडीला लॉकडाऊनमुळे विमान सेवा ठप्प झाल्या होत्या. पण या विश्वविजेत्या खेळाडूची अमेरिकेतून सुटका करण्यात भारताला यश आले आहे. भारताच्या विश्वविजेत्या हॉकी संघातील अशोक दिवान हे सध्याच्या घडीला लॉकडाऊनमुळे अमेरिकेमध्ये अडकलेले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांच्याकडे मदत मागितली होती. 

अशोक दिवान यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले होते की, मी सध्या अमेरिकेत अडकलो आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे मला कॅलिफोर्नियामधील एका हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले होते. माझी प्रकृती सध्याच्या घडीला खालावलेली आहे. त्यामुळे मला भारतामध्ये यायचे आहे. माझे परतीचे तिकिटही रद्द झाले आहे. त्याचबरोबर इन्श्युरन्सही नसल्यामुळे येथील खर्च मला परवडत नाही. त्यामुळे मला मदत करावी आणि माझी भारतामध्ये येण्याची सोय करावी." भारतात परतल्यावर दिवान म्हणाले की, " आज सकाळी मी अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झालो. अमेरिकेत माझी तब्येत बिघडली होती. त्यामुळे मी नरेंद्र बात्रा यांना मला भारतात आणण्याविषयी विनंती केली होती. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि मला भारतात आणले. सध्या तरी मी १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहणार आहे. या साऱ्या प्रक्रीयेत मला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार."