Full Width(True/False)

कोण आहे मरीना कुंवर? जिचा सोनू निगमने केला उल्लेख

मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या घराणेशाहीवरून अनेक वाद रंगले आहेत. या वादात एकामागोमाग एक नवीन नावं पुढे येत आहेत. काहीजण घराणेशाहीबद्दल बोलत अनेक गोष्टी सर्वांसमोर ठेवत आहेत तर काहीजण सोशल मीडियाला नकारात्मक म्हणत त्यापासून दूर जात आहेत. या सगळ्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमने एक वेगळाच विषय समोर आणला आहे. टी-सीरिजचा मालक भूषण कुमारवर त्याने अनेक गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी गायक सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्याने भूषणवर अनेक आरोप केले. व्हिडिओत भूषणला धमकी देताना त्याने मरीना कुंवर या महिलेचं नाव घेतलं. त्यामुळे अचानक मरिना लाइमलाइटमध्ये आली आहे. सध्या सोशल मीडियापासून गूगलवर सगळीकडे मरिनाचं नाव सर्च करण्यात येत आहे. मरिना कुंवर एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. २०१७ मध्ये डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमबद्दल तिने अनेक खुलासे केले होते. मरिनाने सांगितलं होतं की जेव्हा ती राम रहिमकडे गेली होती तेव्हा त्याने मरिनाला मिठी मारली होती. यासोबतच तो मरिनाला अयोग्य पद्धतीने स्पर्श करायचा. एवढंच नाही तर राम रहिम तिला घेऊन बेडरूममध्ये गेला होता. तिला पैशांची किंवा इतर कोणत्याही गोष्टींची चिंता करण्याची गरज नसल्याचं त्याने सांगितलं. ऑगस्ट २०१७ मध्ये राम रहिमला दोन महिलांच्या बलात्कारप्रकरणी २० वर्षांसाठी तुरुंगात ठेवण्यात आले. जेव्हा राम रहिमला तुरुंगात पाठवण्यात आले तेव्हा मरिनाने त्याने दिलेल्या त्रासाबद्दल सांगण्यास सुरुवात केली. सोनू निगमने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने बॉलिवूडमधील काही कलाकारांनावर आरोप केले. यासोबतच त्याने भूषण कुमारवर आरोप करत त्याने वेळीच सावध होण्याचा इशारा दिला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hOt8aN