Full Width(True/False)

सोनू निगमवर भडकली भूषण कुमारची पत्नी, म्हणाली

मुंबई- प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने टी- सीरिजचे मालक भूषण कुमारवर संगीत उद्योग क्षेत्रातील माफिया असल्याचं सांगितलं. यासोबतच सोनूने त्याच्यासोबत पंगा न घेण्याचा सल्लाही दिला. या सगळ्यात भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमारची प्रतिक्रिया समोर आली आहे. दिव्याने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सोनूबद्दल अनेक गोष्टी लिहीत त्याला कृतघ्न असल्याचंही म्हटलं. सोमवारी गायक सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्याने भूषणवर अनेक आरोप केले. व्हिडिओत भूषणला धमकी देताना त्याने मरीना कुंवर या महिलेचं नाव घेतलं. त्यामुळे अचानक मरिना लाइमलाइटमध्ये आली आहे. सध्या सोशल मीडियापासून गूगलवर सगळीकडे मरिनाचं नाव सर्च करण्यात येत आहे. मरिना कुंवर एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. २०१७ मध्ये डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमबद्दल तिने अनेक खुलासे केले होते. मरिनाने सांगितलं होतं की जेव्हा ती राम रहिमकडे गेली होती तेव्हा त्याने मरिनाला मिठी मारली होती. दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, 'आज सर्व गोष्टी यावर अवलंबून असतात की कोण किती चांगलं कॅम्पेन चालवू शकतं. मीही लोकांना या कॅम्पेन अंतर्गत खोटं विकताना पाहत आहे. सोनू निगमसारख्या लोकांना इतरांच्या विचारांशी कसं खेळायचं हे चांगल्याप्रकारे माहीत आहे.' यापुढे लिहिताना दिव्या म्हणाली की, ' तुला टी- सीरिजने सिनेसृष्टीत ब्रेक दिला. तुला एवढं पुढे नेलं. जर तुझ्या मनात एवढाच राग होता तर तेव्हा का नाही बोललास. आज पब्लिसिटीसाठी का करतोयस... तुझ्या वडिलांचे अनेक व्हिडिओ मी स्वतः दिग्दर्शित केले. यासाठी ते नेहमीच कुतज्ञ होते. पण काही लोक नेहमीच कुतघ्न असतात.' या स्टेटसला दिव्याने 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' असं हॅशटॅगही दिलं. सोनू निगमने सांगितल्या अनेक गोष्टी- सोनूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलं की, 'तो माफिया आहे तर माफियासारखाच वागणार. त्याच्यासाठी हे रोजचं आहे. त्याने सहा लोकांना माझ्याविरुद्ध मुलाखत द्यायला सांगितलं. मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं पण आता माझं नाव घेतलं जात आहे.' ' आता तुझं नाव तर मला घ्यावच लागेल. आता तुला अरे- तुरेच करावं लागेल. तू चुकीच्या व्यक्तीविरोधात उभा राहिलास. ते दिवस विसरलास का जेव्हा तू बोलायचास की माझा एखादा अल्बम कर.. सर्वांना वेड लागलं पाहिजे.. मला बाळासाहेब ठाकरेंची भेट घालून दे.. अबू सालेमपासून वाचव.. या सर्व गोष्टी लक्षात आहेत की नाही... मी अजूनही तुला सांगतो की माझ्या तोंडी तू लागू नकोस.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3erxkep