Full Width(True/False)

सुशांतची अधुरी स्वप्नं 'ही' अभिनेत्री करणार पूर्ण

मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येमुळं त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूडला धक्का बसला आहे. टीव्ही अभिनेता ते बॉलिवूड स्टार त्याचा हा प्रवास पाहून अनेक तरुण आज या सिनेसृष्टीत येण्याचं स्वप्न पाहात होते. परंतु सुशांतच्या अचानक एक्झिटमुळं त्याच्या स्वप्नांची यादी देखील चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं सोशल मीडियावर त्याच्या स्वप्नांची यादी शेअर केली होती. यातली अनेक स्वप्न अपूर्ण आहेत. ही स्वप्न आता त्याची मैत्रिण पूर्ण करणार आहे. सुशांतचा शेवटचा 'दिल बेचारा' याचित्रपटातील त्याची सहकलाकार आणि अभिनेत्री हिनं सोशल मीडियावर पोस्ट करत सुशांतची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन, असं म्हटलं आहे. सुशांतच्या त्या ५० स्वप्नांची यादी: सुशांतनं आपल्या ५० स्वप्नांची यादी सोशल मीडियावर शेअर केली होती. विमान चालवत आकाशात त्याला झेप घ्यायची होती. निळ्याशार समुद्रात त्यात सूर मारायचा होता. भावी पिढीला नृत्याचे धडे द्यायचे होते. देशाच्या संरक्षण दलासाठी त्याला काम करायचं होतं. ब्रह्मांडातील ग्रह, ताऱ्यांची रचना त्याला समजून घ्याची होती. ही आणि यांसारखी तब्बल ५० स्वप्नं सुशांतने पाहिली होती. परंतु त्याच्या जाण्याने ही स्वप्न अपूर्णच राहिली आहेत. सुशांतला नेहमी नवे काहीतरी शिकत राहायचे होते. लॉकडाउनच्या गेल्या काही दिवसांमध्येदेखील तो कम्प्युटर गेम्सचे कोडिंग शिकत होता. स्वप्नांना गवसणी घालू इच्छिणाऱ्या सुशांतनं स्वतःची जी बकेट लिस्ट सांगितली होती, ती अत्यंत आगळीवेगळी होती. त्याला मोर्स कोड (गुप्तचरांची भाषा) शिकायची होती. टेनिस, बुद्धिबळ आणि पोकरच्या चॅम्पियन खेळाडूंसोबत त्याला खेळायचे होते. सिक्स पॅक अॅप्सची शरीरयष्टी त्याला साध्य करायची होती. नासा या अंतराळ संशोधन केंद्रातील वर्कशॉप त्याला पूर्ण करायचे होते. कैलास पर्वत त्याला सर करायचा होता. अंटार्क्टिकाला जायचं होतें, ज्वालामुखीचा फोटो क्लिक करायचा होता. स्वामी विवेकानंद यांच्यावर त्याला माहितीपट करायचा होता. एक पुस्तकही त्याला लिहायचं होतं. तसेच १० नृत्यप्रकार त्याला शिकायचे होते. ट्रेननं युरोप फिरणं, तिरंदाजी करणं, रेसनिक हैलिडेच्या भौतिकशास्त्राचे पुस्तक वाचणं, लेम्बर्गिनी गाडी विकत घेणं, गिटारवर गाणी वाजवायला शिकणं, शेतीकाम शिकणं आदी पन्नास वैविध्यपूर्ण गोष्टी त्याला करायच्या होत्या. त्यानं आपल्या बकेट लिस्टमधील काही स्वप्नं पूर्णही केली होती. विमान चालवण्याचे प्रशिक्षण त्यानं पूर्ण करून आकाशात झेप घेतली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Bup9iK