मुंबई- सुशांतसिंह राजपूतचा ब्रोकर सनी सिंहने एक मोठा खुलासा केला आहे. सनी म्हणाला की, सुशांत आणि त्याची कथित प्रेयसी दोघंही घर शोधत होते. वांद्रे परिसरातील ब्रोकर सनीने सुशांत आणि रियासंबंधी अनेक गोष्टींचा खुलासा केला. पार्टी केल्याबद्दल मिळाल्या होत्या नोटीस- सुशांतने आत्महत्या केली पण मागे अनेक प्रश्न सोडून गेला. त्याने आत्महत्येचा निर्णय का घेतला हे अजूनपर्यंत कळू शकले नाही. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. पोलिसांनीही त्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. यादरम्यान, रिया आणि सुशांतचा ब्रोकर सनीचा जबाब समोर आला आहे. सनी म्हणाला की, ' आणि रिया चक्रवर्ती दोघं एकत्र घर शोधत होते. हे घरही दोघांनी एकत्रच घेतलं असेल. भाड्यावरून सुशांतची कधीच कोणती तक्रार आली नाही. पण रात्रभर चालणाऱ्या पार्टीवरून त्याला अनेक नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.' रिया आणि सुशांत वांद्रेमध्येच पाहत होते घर- सनीने सांगितलं की, रियाला तो फारआधीपासून ओळखतो. अनेकदा ते भेटले आहेत. सुशांतला फ्लॅट दाखवण्याच्या निमित्ताने दोघं एक- दोन वेळाच भेटले आहेत. रिया आणि सुशांत लग्न करणार असल्याचं त्याला सांगितलं होतं. याचसाठी दोघं वांद्रे येथे घर पाहत होते. मीडिया रिपोर्टनुसार, रिया सुशांतच्या घरीच राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती स्वतःच्या घरी रहायला गेली. सुशांतच्या अंत्यसंस्कारांवेळीही रिया त्याच्या कुटुंबियांसोबत होती. सुशांतचा भाऊ म्हणाला नोव्हेंबरमध्ये होणार होतं लग्न- पटणावरून सुशांतचा चुलत भाऊ पन्ना सिंह म्हणाला की, सुशांत नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होता. तो कोणासोबत लग्न करणार याबद्दल त्याने काही सांगितलं नव्हतं. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सुशांत नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच लग्नाची तयारी करण्यासाठी मुंबईत जावं लागेल असंही ते म्हणाले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hwT0aT