न्यूयॉर्क- अमेरिकास्थित खगोलशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक डॉ. करण जानी यांनी सुशांतसिंह राजपूतच्या आयुष्यातील एका अशा महत्त्वपूर्ण मुद्द्याला हात घातला ज्याबद्दल फारसं कोणाला माहीत नाही. सुशांतने त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. डॉ. जानी यांना सुशांतच्या आत्महत्येबद्दल जेव्हा कळलं तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी ट्विटरवर सुशांतशी निगडीत एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले की, 'मी फार नशिबवान आहे की मला तुझ्यातल्या दुसऱ्या पैलू पाहता आला. त्याच्या घरात पुस्तकांचा भंडार होता. त्याला वाचनाची प्रचंड आवड होती. त्याच्यातल्या याच गोष्टी त्याला तत्सम बॉलिवूडकरांपेक्षा वेगळं करत होत्या.' डॉ. जानी यांनी पुढे लिहिले की, 'सुशांतच्या बाल्कनीत तुम्हाला एक मोठा टेलिस्कोप दिसेल. त्याला अॅस्ट्रे फिजिक्स, स्ट्रिंग थिअर आणि सॅटर्नबद्दल बोलायला प्रचंड आवडायचं. सिनेसृष्टीत फारच कमी लोक असतील ज्यांना याबद्दल माहीत असेल आणि याा गोष्टींची माहिती घेण्याची इच्छा असेल. त्याचाकडचं टेलीस्कोप हे अत्यंत महागडं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. त्याला अमेरिकेतील LIGO लॅबमध्ये जाण्याची इच्छा होती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की सुशांतने ते भलंमोठं टेलिस्कोप सोनचिरिया सिनेमाच्या चित्रीकरणावेळी चंबळला नेलं होतं. तिथून त्याला नेब्यूला पाहायचं होतं आणि ते अनुभवायचं होतं. अंतराळात असणाऱ्या धूळ आणि गॅसच्या मिश्रणाने ढगांचा समूह तयार होतो त्याला नेब्युला म्हणतात. उत्तमरित्या दिस घेऊन गेला होता.' डॉ जानी म्हणाले की, 'सुशांतच्या जाण्याने अनेकांनाच धक्का बसला आहे. यावेळी मला डेविड बॉवी यांचं १९६९ मधील प्रसिद्ध गाणं 'स्पेस ओटिडी'तील बोल आठवत आहे.. हा तारा दुसऱ्यांपेक्षा वेगळा होता...' दरम्यान, २०१८ मध्ये एशियन पेन्टच्या एका व्हिडिओमध्ये सुशांतने त्याचं घर दाखवलं होतं. यावेळी त्याने टेलिस्कोप आणि पुस्तकंही दाखवली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hqYi7I