Full Width(True/False)

सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. याबद्दलची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. आता त्याचा रिपोर्ट समोर आला आहे. त्याचे शवविच्छेदन जुहू येथील कूपर इस्पितळात करण्यात आलं. या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं की, त्याने आत्महत्या केली. असं असलं तरी सुशांतच्या अवयवांमध्ये विष नव्हतं ना याची चाचणी करण्यासाठी शरीरातील काही नमुने जे.जे. इस्पितळात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पटणावरून त्याचं कुटुंब रात्री मुंबईत दाखल झालं. यावेळी त्याच्या बहिणींसह वडिलही मुंबईत आले. नक्की सकाळी काय घडलं- - सुशांत सकाळी ६.३० वाजता उठला. - सकाळी ९.३० वाजता त्याने डाळिंब्याचा रस प्यायला आणि त्यानंतर स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. - १०.३० वाजता स्वयंपाकी दुपारच्या जेवणात काय खाणार हे विचारण्यासाठी त्याच्या खोलीजवळ गेला. पण त्याने दरवाजा उघडला नाही. - स्वयंपाकी दुसऱ्यांदा १२ वाजता त्याला हाक मारायला गेला. तेव्हाही त्याने दार उघडलं नाही. खूप वेळ दरवाजा वाजवल्यानंतरही आतून काही उत्तर न आल्यामुळे त्यांनी फोन करायला सुरुवात केली. - सुशांत उत्तर देत नाही हे पाहून घरातील कर्मचारी घाबरले. त्यांनी लगेच १२.३० च्या सुमारास सुशांतच्या बहिणीला फोन केला. सुशांतची बहीण गोरेगाव येथे राहते. - जवळपास ४० मिनिटांनंतर मितू सिंह त्याच्या घरी पोहोचली. तिनेही सुशांतला आवाज दिला, फोन केला. पण या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही. - जवळपास १.१५ वाजता चावीवाल्याला बोलावण्यात आलं. लॉक उघडत नसल्याचं पाहून चावीवाल्याने लॉक तोडलं. - दुपारी ३.३० वाजता कूपर इस्पितळात त्याला नेण्यात आलं. साधारणपणे ४.०० वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं. - शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. तरीही त्याच्या शरीरातील नमूने तपासणीसाठी जे.जे. इस्पितळात पाठवण्यात आले आहेत. सुशांतसिहं राजपूतचं अभिनय करिअर सुशांतने 'किस देश में है मेरा दिल' मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं. यानंतर सुशांतने परिणीती चोप्रासोबत शुद्ध देसी रोमांस सिनेमात काम केलं. पण त्याच्या नावाची सर्वात जास्त चर्चा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी या सिनेमातून झाली. हा सुशांतच्या करिअरमधला पहिला सिनेमा होता ज्याने १०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. सोनचिडिया आणि छिछोरे या सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. सारा अली खानसोबतच्या केदारनाथ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. कॉलेज दिवसांमध्ये सुशांतने शामक दावरच्या डान्स क्लास भाग घेतला होता. डान्स क्लासमधील काही मित्रांसोबत त्याने अभिनय शिकण्यासाठी बेरी जॉन्स ड्रामा क्लासमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं. डान्स क्लासमध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये सुशांत सर्वोत्कृष्ट होता. याचसाठी शामकच्या डान्स टीममध्ये त्याचा सहभाग झाला. २००५ मध्ये ५१ व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्यावेळी सुशांतने बॅकग्राउड डान्सर म्हणून काम केलं होतं. २००६ च्या कॉमनवेल्थ गेम्सवेळीही त्याने बॅकग्राउण्ड डान्सर म्हणून काम केलं. मुंबईत आल्यानंतर नादिरा बब्बर यांच्या एकजूट थिएटर ग्रुपमध्ये सहभाग घेतला. दोन वर्ष सुशांतने या ग्रुपसोबत काम केलं. नेसले मंचच्या जाहिरातीनंतर सुशांतचा चेहरा ओळखीचा झाला. २००८ मध्ये एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्मच्या किस देश मैं हे मेरा दिल या मालिकेसाठी निवड झाली. यानंतर २००९ मध्ये एकता कपूरच्या पवित्र रिश्ता मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. छोट्या पडद्यावरील करिअर- २००८- किस देश मैं हे मेरा दिल २००९- पवित्र रिश्ता २०१०- जरा नचके दिखा २ २०१०- झलक दिखला जा ४ सिनेमांमधील करिअर- २०१३- काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स २०१४- पीके २०१५- डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी २०१६- एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी २०१७- राबता २०१८- केदारनाथ २०१९- सोनचिरिया, छिछोरे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30HA1Ep