Full Width(True/False)

मृत्यूपूर्वी सुशांतने लिहिलेली ५० स्वप्न, राहिली अपूर्णच

मुंबई- Suicide वयाच्या ३४ व्या वर्षी डिप्रेशनमुळे सुशांतसिंह राजपूतने मृत्यूला जवळ करणं अधिक सोप्पं समजलं. सुशांतने मेहनतीने स्वतःचं सिनेसृष्टीत नाव कमावलं. बिहारचा राहणाऱ्या सुशांतने बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान तयार केलं होतं. त्याची स्वप्नही मोठी होती. गेल्या वर्षी सुशांतने ५० गोष्टींची एक 'ड्रीम लिस्ट' तयार केली होती. यात त्याने जीवनात एकदा तरी या सर्व गोष्टी करायच्या अशी स्वप्न त्याने पाहिली होती. त्याने सोशल मीडिया अकाउंटवरही ही लिस्ट शेअर केली होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुशांतने त्याला पूर्ण करण्याची स्वप्न एका कागदावर उतरवली होती. यातली काही स्वप्न त्याने पूर्ण केली होती. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही त्याने शेअर केले होते. मात्र काही दिवसांनी त्याने ही पोस्ट डिलीट केली. अगदी कमी वयात त्याने अनेक मोठी स्वप्न पाहिली आणि त्यातली अनेक स्वप्न त्याने स्वबळावर पूर्णही केली. त्याच्या या स्वप्नांमध्ये विमान उडवण्याचं त्याचं स्वप्न होतं. (त्याने विमान उडवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता), यासोबतच नेत्रहिन मुलांना कॉम्प्यूटर कोडिंग शिकवणं, सहा आठवड्यात सिक्स पॅक अॅब बनवणं, IRONMAN triathlon आणि डिझनीलँड जाण्यासारखी अनेक स्वप्न त्याने यात लिहिली होती. त्याला ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना सेल्फ- डिफेन्सही शिकवायचं होतं, डायविंग, तीरंदाजी, विमान उडवायला शिकणं.. अशी अनेक मोठी स्वप्न सुशांतसिंह राजपूतने उराशी बाळगली होती. रविवारी १४ जून रोजी सुशांतसिंह राजपूतने त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने यासंबंधी पोलिसांना माहिती दिली. सुशांतने आत्महत्या का केली याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं होतं. याशिवाय पोलिसांनाही सुशांतच्या घरात डिप्रेशनवर सुरू असलेल्या ट्रीटमेन्टची फाइल मिळाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2N0jcwE