Full Width(True/False)

टीव्ही अभिनेता म्हणून सुशांतला चिडवायचे, अभिनेत्रीचा आरोप

मुंबई- शांतसिंह राजपूतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारांवेळी त्याच्या कुटुंबासोबत बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीही उपस्थित होते. यावेळी रिया चक्रवर्ती, क्रिती सेनॉन, विवेक ओबेरॉय स्मशानभूमीत उपस्थित होते. विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशात काहींनी बॉलिवूडकरांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर काहींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, अभिनेत्री कोयना मित्राने मात्र आपली वेगळीच मतं माडंली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोयनाने बॉलिवूडवर आगपाखड केली. सिनेसृष्टीत सुशांतला नेहमी आउटसायडर म्हणूनच वागवलं जायचं असं तिने सांगितलं. कोयना म्हणाली की, 'सुशांत अभिनेता म्हणून उत्तम होताच शिवाय दिसायलाही सुंदर होता. चांगले सिनेमे करून तो यशस्वी झाला होता. मी एका वक्तव्यामध्ये वाचलं होतं की त्याला नेहमी आउटसायडरची वागणूक दिली जायची. त्याला पार्टी आणि लग्नात बोलावलं जायचं नाही. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. सुशांत पहिला नव्हता.' कोयना पुढे म्हणाली की, 'जोवर सिनेसृष्टीत तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती नसते तोवर सिनेसृष्टी तुम्हाला त्यांच्यातलं एक समजतच नाही. हेच फार दुःखद आहे. असे अनेक सुशांत सिनेसृष्टीत आहेत. मी सुशांतला कधीच डरपोक म्हणणार नाही. कारण त्याने काय सहन केलं असेल याची कोणालाच कल्पना येणार नाही. त्याला अपयशी आणि लाचार बोलण्याचा कोणालाच अधिकार नाही.' कोएना असंही म्हणाली की, अभिनेते वेगवेगळ्या भागातून येतात. तर त्यांची मस्करी उडवली जाते. 'जे लोक सुशांतच्या निधनावर आत दुःख व्यक्त करत आहेत त्यांनीच कधीतरी त्याची टीव्ही स्टार म्हणून थट्टा उडवली होती. जर तुम्ही फॅशन इण्डस्ट्रीतून येतात तर मॉडेलना काही येत नाही आणि जर तुम्ही टीव्ही इण्डस्ट्रीमधून आलात तर तुम्हाला काही स्टॅडर्ड नसतं. जॉन अब्राहम, सुष्मिता सेन आणि प्रियांका चोप्रालाही या गोष्टी सहन कराव्या लागल्या होत्या. काही वर्षांपूर्वी प्रियांकाचं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. पण ती हूशार निघाली. ती या सगळ्यातून बाहेर पडली आणि चांगलं करू लागली.' दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ने त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. सुशांत असं काही पाऊल उचलेलं याचा कोणी विचारही केला नव्हता. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्यग्रस्त होता. त्याच्या आत्महत्येचं कारण नैराश्य सांगितलं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YCYwQt