Full Width(True/False)

सुशांत जे तुझ्यासोबत झालं ते त्यांचं कर्म- शेखर कपूर

मुंबई- बॉलिवूडमध्ये आपल्या बळावर स्वतःचं नाव कमावलेल्या सुशांतसिंह राजपूतने रविवारी १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशात काहींनी सोशल मीडियावर बॉलिवूडकरांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर काहींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सुशांतच्या मृत्यूशी निगडीत एक पोस्ट केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं की, सुशांत त्यांच्याकडे जाऊन रडला होता. शेखर कपूर यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'तुला किती वेदना झाल्या असतील याची मला जाणीव आहे. मला त्या लोकांचीही गोष्ट माहीत आहे ज्यांनी तुला पूर्णपणे निराश केलं. यानंतर तू माझ्या खांद्यावर डोकं टेकून रडला होतास. गेले सहा महिने मी जर तुझ्यासोबत असतो तर.. जर तू माझ्याशी बोलला असतास तर.. तुझ्यासोबत जे झालं ते तुझं नाही तर त्यांचं कर्म आहे.' शेखर यांच्या ट्वीटवरून स्पष्ट होतं की सुशांतसोबत काही तरी असं घडलं ज्यामुळे तो आतून पुरता कोसळला. काहीतरी असं झालंय जे सुशांतने शेखर यांना सांगितलं होतं. शेखर यांनी नक्की काय झालं याचा खुलासा केला नाही. तसेच त्या कोण व्यक्ती होत्या याबद्दलही सांगितलं नाही. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारांवेळी त्याच्या कुटुंबासोबत बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीही उपस्थित होते. यावेळी रिया चक्रवर्ती, क्रिती सेनॉन, विवेक ओबेरॉय स्मशानभूमीत उपस्थित होते. विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2zwnU1Q