Full Width(True/False)

शाहरुखने उडवली होती सुशांतची खिल्ली; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आता या जगात नाहीए. त्याच्या या अकाली एक्झिटमुळं अनेकांना धक्का बसला आहे. पण त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलिस करत आहेत. त्याला बॉलिवूडमध्ये वाईट वागणूक देत त्याच्याकडून काम काढून घेतल्यानं नैराश्य आलं होतं, त्यामुळं त्यानं आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेत, त्यामध्ये सुशांतला योग्य वागणूक दिली जात नव्हती असं दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता शाहरुख खान आणि शाहिद कपूर यांनी सुशांतची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ पोहून चाहत्यांनी संताप व्यक्त करत शाहरुख आणि शाहिदला खडेबोल सुनावले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ पाहून प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांनी देखील संताप व्यक्त केलाय.'हा व्हिडिओ पाहून मला धक्काच बसलाय. मनोरंजवाच्या नावाखाली हा सगळा विचित्र प्रकार सुरु होता. सुत्रसंचालनाच्या नावाखाली नवोदित अभिनेत्याचा असा अपमान करनं कितपत योग्य होतं? असं म्हणत त्यांनी शाहरुख आणि शाहिदला टॅग केलं आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधली एक काळी बाजू समोर येऊ लागली आहे.नवोदित आणि संघर्ष करून येणाऱ्या कलाकारांसोबत ही इंडस्ट्री भेदभाव करत असल्याचं म्हटलं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YFmuuz