पणजी- मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री यांच्या वडिलांचे यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८८ इतके होते. गोव्या मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते. उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. वृद्धापकाळाने अलिकडे ते आजारी होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच गोव्यातील विविध समाज घटकांत दु:ख व्यक्त झाले. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून १९६२ साली मुक्तता झाली मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष सतरा वर्षे सत्तेत होता. उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून सत्तरच्या दशकात उसगावकर यांनी भरपूर लोकोपयोगी कामे केली. प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग भाऊंची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fvyghI