Full Width(True/False)

OnePlus 8 Pro खरेदीसाठी झुंबड, सेकंदात विकले फोन

नवी दिल्लीः वनप्लसने एप्रिल मध्ये लाँच केली होती. या दरम्यान कंपनीने वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो फोन लाँच केले होते. भारतात वनप्लस ८ प्रो ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी या फोनचा सेल आयोजित करण्यात आला होता. हा फोन अवघ्या काही सेकंदात झाला. सेल सुरू होताच कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि अॅमेझॉन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सोल्ड आऊट मेसेज दिसला. भारतात या स्मार्टफोनचा पहिला सेल होता. वाचाः भारतात वनप्लस ८ प्रोची किंमत भारतात च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. ग्लेशियल ग्रीन, ऑनेक्स ब्लॅक आणि अल्ट्रामरिन ब्लू या रंगात हे फोन खरेदी करता येवू शकते. भारतीयांना नाही मिळणार X-Ray फीचरची मजा भारतीय ग्राहकांना वनप्लस ८ च्या X-Ray फीचरचा वापर करता येणार नाही. प्रायव्हसी संबंधीत काही समस्या असल्याने कंपनीने हे फीचर स्मार्टफोनमध्ये डिसेबल केले आहे. वाचाः या ऑफर्स मिळणार रेडमी नोट प्रोचा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. आजच्या या से OnePlus 8 Pro चे वैशिष्ट्ये या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शनचा ६.७८ इंचाचा QHD+ Fluid AMOLED डिस्प्ले दिला आहे. लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर सोबत असलेल्या या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. रियर पॅनलवर क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ४८ मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा कलर फिल्टर लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. अँड्रॉयड १० बेस्ड OxygenOS वर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4510mAh बॅटरी दिली आहे. ३० टी वॉर्प चार्ज सपोर्ट देते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2N0GimT