Full Width(True/False)

सुशांतसाठी आता पोस्ट लिहिणं हा सगळा दिखावा; सैफ अली खान भडकला

मुंबई: बॉलीवूड अभिनेता यांच्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. या अभिनेत्याच्या मृत्यूनं केवळ बॉलिवूड कलाकारच नव्हे तर सर्वसामान्यांनाही चकित केले आहे. रविवारी त्यांच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या निधनानंतर बॉलिवूड तसेच क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटल्या, अजूनही त्या उमटत आहेत. बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी आता सोशल मीडियावर त्याच्याबद्दल पोस्ट शेअर करत आहेत. यावर अभिनेता यानं राग व्यक्त केला आहे. ' आता या जगात नाहीए. तो गेल्यानंतर दु:ख व्यक्त करतायत त्यांना तो या जगात होता तेव्हा त्याच्याबद्दल काळजी वाटली नव्हती, त्यामुळं हा सगळा दिखावा बंद करा असं म्हणत सैफनं त्याचा संताप व्यक्त केला.'सुशांतच्या आत्महत्येची घटना ही खरचं प्रचंड दु:ख देणारी आहे. त्याच्या आत्महत्येवर अनेकांनी लगेचच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हेच लोक आहेत जे त्याच्या जाण्याचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करुन घेतायत. सोशल मीडियावर जे काही सुरू आहे ते सर्व निंदनीय आहे', असंही सैफ म्हणतो. 'या इंडस्ट्रीत कोण कोणाची काळजी करत नाही. इंडस्ट्रीत प्रचंड स्पर्धा आहे. तुम्ही एखाद्याबद्दल काळजी करताय असं दाखवत असाल तर तो ढोंगीपणाच आहे. आणि मला वाटतं एखादा व्यक्ती गेल्यानंतर खोटी काळजी दाखवणं किंवा करणं त्याचा अपमान आहे', असंही सैफनं म्हटलं आहे. सुशांतच्या निधनावर राजकारण केलं जात असून हे वेदनादायक असल्याचंही मतही त्यानं व्यक्त केलं. दरम्यान, मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिला देखील सुशांतच्या जाण्याचा हा धक्का सहन झाला नसल्याचं सांगितलं. 'तिला सुशांतचे अनेक गुण आवडायचे. मी 'दिल बेचारा’या चित्रपटात कॅमियो केला होता, तेव्हा देखील मला त्याच्या स्वभावातील चांगुलपणा जाणवला होता'.असं सैफ म्हणाला. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांत यानं रविवारी दुपारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येनं केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर देशही हळहळला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत काल त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याच्या आत्महत्येच्या कारणांवरून सुरू झालेली चर्चा थांबताना दिसत नाही. सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आलं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तर, तो सिनेसृष्टीतील राजकारणाचा बळी ठरला आहे. त्याचा खून झाला आहे, असा आरोप काहींनी केला आहे. त्यामुळं त्याच्या आत्महत्येचं गूढ वाढलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2N7AVlD