मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी दावा केला की सुशांतचा घराणेशाहीमुळे बळी गेला. याचमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने जगण्यापेक्षा मरण पत्करलं. दरम्यान, सोशल मीडियावर अशाही चर्चा सुरू झाल्या की सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान जाणून घ्या पोलीस, शवविच्छेन अहवाल आणि फॉरेन्सिक तज्ञ अहवालानुसार हा दावा किती खरा आहे... शवविच्छेदनाचा अहवाल काय सांगतो- च्या शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट लिहिण्यात आलं आहे की, गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येमध्ये गुदमरून मृत्यू होतो. याशिवाय या अहवालात गळा दाबून मारण्याचा किंवा इतर कोणत्याही झटापटीचा उल्लेख नाही. त्यामुळे सुशांतची हत्या झाली असेल हा दावा खोटा सिद्ध होतो. खोलीत स्टूल का नव्हतं- काही सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दावा केला की, ज्या खोलीत सुशांतने आत्महत्या केली तिथे स्टूल किंवा खुर्ची अशा उंच गोष्टी आढळल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅनपर्यंत पोहोचण्यासाठी सुशांतच्या बेडची उंची आणि त्याची उंची पुरेशी होती. सुशांत उंच असल्यामुळे त्याला अतिरिक्त सामानाची गरज भासली नाही. मेडिकल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्यामते, अनेक केसमध्ये असं दिसण्यात आलं आहे की, ज्या गोष्टींचा आधार घेऊन फाशी लावली जाते त्यात आणि त्यांच्या पायांमध्ये फार कमी अंतर असतं. त्यामुळे असं म्हटलं जातं की, सुशांतच्या आत्महत्येमध्येही काहीसं असंच झालं असेल. दरवाजा बाहेरून बंद होता?- सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सुशांतची हत्या केल्यानंतर दरवाजा बाहेरून बंद केला गेला. यासंबंधी पोलिसांनी चावी तयार करणाऱ्याचाही जबाब घेतला आहे. चावी तयार करण्याने स्पष्ट केलं की, दरवाजा आतून बंद होता. त्याने सांगितलं की, सुशांतचा दरवाजा सुरुवातीला बाहेरून उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या दरवाजाच्या लॉकसोबत कोणीही छेडछाड केली नव्हती आणि दरवाजा बाहेरूनही बंद नव्हता. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन सुशांतची हत्या केल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं समोर येतं. शवविच्छेदनाचे रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि चावी बनवणाऱ्याचा जबाब यावरून सुशांतने आत्महत्या केल्याचं स्पष्ट होतं. मुंबई पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. यानंतर पोलीस व्यावसायिक शत्रूत्व, नैराश्य आणि खासगी आयुष्य या सर्व गोष्टींचा तपास केला जात आहे. याचमुळे सोशल मीडियावर होणाऱ्या दाव्यांवर लक्ष न देण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NlkZfP