मुंबई: सिनेइंडस्ट्रीतली घराणेशाही, काही नव्या कलाकारांना काम न देणं या मुद्द्यांवरुन बॉलिवूडमधलं वातावरण तापलं आहे. घराणेशाहीचा मुद्दा तर चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. यात सर्वाधिक लक्ष केलं जातंय ते निर्माता करण जोहर, अभिनेता , अभिनेत्री , सोनाक्षी सिन्हा आणि सोनम कपूर यांना. नेटकऱ्यांनी संतापून त्यांना कमालीचं ट्रोलही केलंय आणि त्यांना सोशल मीडियावर अनफॉलोसुद्धा केलंय. सोशल मीडियावरील घराणेशाहीवरुन होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर करण जोहरचे १ लाख ८८ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. तर दुसरीकडे सलमानचेही ५० हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. घराणेशाही विरोधातील संतापाचा सर्वाधिक फटका बसलाय तो अभिनेत्री आलिया भट्टला. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री सोनम कपूरच्या बाबतीत घडला आहे. तिचे ८४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. शेवटी कमेंट सेक्शन बंद करण्याची वेळ तिच्यावर आली. तर दुसरीकडे त्यांना विरोध करणाऱ्या कंगनाचे फॉलोअर्स मात्र वाढत आहेत. सध्या ती उघडपणे घराणेशाहीला लक्ष्य करत व्यक्त होते आहे. कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांमध्ये तिचे तब्बल १२ लाख फॉलोअर्स वाढले. यापूर्वी तिचे २० लाख फॉलोअर्स होते. आता ३२ लाख लोक तिला फॉलो करत आहेत. सुशांतचे फॉलोअर्स वाढले सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतचे फॉलोअर्स देखील कमालीचे वाढले आहेत. सुशांतचे इन्स्टाग्राम अकाउंटमध्येही एक बदल करण्यात आला आहेत. त्याचं हे सोशल मीडिया अकाउंट मेमोरियल अकाऊंटमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. 'Remembering' हा शब्द आता सुशांतच्या अकाउंटवर दिसत आहे. सुशांतच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकली असता त्याच्या प्रत्येक पोस्टमागं काही तरी अर्थ दडलेलं असायचा. त्याच्या शेवटच्या पोस्टमध्ये देखील त्याच्या मनात सुरू असलेली घालमेल पाहायला मिळते. त्यानं त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर करत एक भावुक असं कॅप्शन लिहिलं होतं. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांना अद्याप पचवता आलेला नाही. सुशांतच्या मेहुण्यानं या घटनेमध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या मामानंही सुशांतनं आत्महत्या केली नसल्याचं सांगितलं आहे. शवविच्छेदन अहवालात गुदमरल्यामुळं मृत्यू झाल्याचं कारण सांगितलं गेलं असलं, तरी पोलिस अधिक तपास करत आहेत. त्याच्या अकाली जाण्यामागे एखादा कट असल्याची शक्यता वर्तवली जातेय. यापूर्वीही काही अभिनेते-अभिनेत्रींचे मृत्यू संशयास्पदरित्या झाले होते. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी काही दिवस त्याची यापूर्वीची मॅनेजर दिशा सालियननंही आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BuVfLh