Full Width(True/False)

एखाद्याच्या निधनानंतर त्याच्या सहकाऱ्यांना दोष देणं चुकीच: सोनम कपूर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता यानं रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतला नैराश्यानं ग्रासलं होतं आणि त्यामुळंच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय तर, काहींनी सुशांतच्या आत्महत्येचं मुळं कारण हे बॉलिवूडमधील घराणेशाही हे असल्याचा आरोप केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. परंतु अभिनेत्री हिनं सुशांतच्या निधनासंदर्भात केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. सोनमनं ट्विट करताना लिहिलं आहे की, 'एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड, कुटुंबीय आणि त्याच्या सहकाऱ्यांना दोष देणं चुकीचं आहे.' सोनमनं केलेलं हे ट्विट सुशांतच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना पटलं नाही. त्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भटकलेल्या नेटकऱ्यांनी घराणेशाहीचामुद्दा उचलून धरत सोनमवर निशाणा साधला आहे. एका ट्विटर युजरनं म्हटलं आहे की,'हा गर्लफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंडचा मुद्दाच नाहीए. त्यांना कोणीही दोष देत नाहीए. खरा दोष हा बॉलिवूडमधल्या घराणेशाहीला दिला जातोय. तर एकानं 'तू अनिल कपूरची मुलगी नसतीस तर कुठं तरी घरकाम करत असतीस', असं म्हटलं आहे. दरम्यान, सुशांतनं आत्महत्येचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात पोलिस आता तपास करणार आहेत. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? याची चौकशी केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून यात त्यांचा मृत्यू गळफास लागल्यानं झाला असल्याचं स्पष्ट झालंय. तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होता असंही त्या अहवालात म्हटलं आहे. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धा हेच याचे कारण आहे? का याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावतील असंही त्यांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hwbTdT