मुंबई :हॉलिवूडचा सर्वोच्च पुरस्कार सोहळा मानला जाणाऱ्या '' पुरस्कार सोहळ्याला करोना विषाणूमुळे फटका बसणार असल्याचं दिसून येतंय. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाचा 'ऑस्कर' सोहळा रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अॅकेडमी संस्थेचे सदस्य डॉन हडसन ऑस्कर स्पर्धेतील बदललेल्या नियमांवर भाष्य केलं. "ऑस्कर पुरस्कांरासाठी जगभरातील चित्रपटांचा विचार केला जातो. मात्र सध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. परिणामी सिनेसृष्टी पूर्णपणे ठप्प आहे. काही चित्रपट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी ऑस्कर नामांकनासाठी ओटीटीवरील चित्रपटांचाही विचार केला जाणार आहे. परंतु, यासाठी ऑस्करच्या मूलभूत नियमांमध्ये बदल करावा लागेल. कारण नियमानुसार केवळ सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित झालेले चित्रपट ऑस्करसाठी पात्र ठरतात. नव्या नियमांवर अॅकेडमी संस्थेचे काही सदस्य काम करत आहेत. परंतु हे सर्व तेव्हाच होईल जेव्हा करोना नियंत्रणात येईल, परिस्थिती सामान्य होईल. असं जर घडलं नाही, तर यावेळचा ऑस्कर सोहळा रद्ददेखील केला जाऊ शकतो", असं हडसन यांनी सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YGWij1