मुंबई: अभिनेता यानं आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून सुशांतच्या बहिणीसह सहा जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणी सुशांतचे कुटुंबिय, मॅनेजर आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. त्याची मॅनेजर ही देखील वांद्रे पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी आल्याची माहिती आहे. रोहिणी सुशांतची चांगली मैत्रिण होती. तिनं त्याची पब्लिक रिलेशन मॅनेजर म्हणूनही काम पाहिलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर रोहिणीनं सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली होती. त्यात तिनं सुशांतबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्यात. त्यामुळं पोलिसांनी तिला देखील चौकशीसाठी बोलवलं होतं. रोहिणी सोमवारी सकाळी वांद्रे पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी आली होती. त्यानंतर तिची आठ ते नऊ तास चौकशी झाल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रोहिणीनं सुशांतला आर्थिक अडचण नव्हती असेही संदर्भ शेअर केले आहेत. तसंच त्याच्या काही खासगी आयुष्यातील गोष्टींसंदर्भात रोहिणीची चौकशी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. रिया चक्रवर्तीची देखील करण्यात आली चौकशी चार दिवसांपूर्वी सुशांतची गर्लफ्रेंड हिची देखील तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती. आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी रिया सुशांतचं घर सोडून तिच्या घरात शिफ्ट झाली होती. अशाही चर्चा होत्या. त्यामुळं या दोघांच्या नात्यासंदर्भात पोसिल चौकशी करत आहेत. रियानं देखील पोलिसांनी सहकार्य करत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली असून गरज वाटल्यास संबंधित विभागाचे डीसीपी सुद्धा रियाची चौकशी करण्याची शक्यता आहे. पोलिसांनीही त्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. यादरम्यान, रिया आणि सुशांतचा ब्रोकर सनीचा जबाब समोर आला आहे. सनी म्हणाला की, 'सुशांतसिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती दोघं एकत्र घर शोधत होते. हे घरही दोघांनी एकत्रच घेतलं असेल. भाड्यावरून सुशांतची कधीच कोणती तक्रार आली नाही. पण रात्रभर चालणाऱ्या पार्टीवरून त्याला अनेक नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.' सनीनं सांगितलं की, रियाला तो फारआधीपासून ओळखतो. अनेकदा ते भेटले आहेत. सुशांतला फ्लॅट दाखवण्याच्या निमित्ताने दोघं एक- दोन वेळाच भेटले आहेत. रिया आणि सुशांत लग्न करणार असल्याचं त्याला सांगितलं होतं. याचसाठी दोघं वांद्रे इथं घर पाहत होते. मीडिया रिपोर्टनुसार, रिया सुशांतच्या घरीच राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती स्वतःच्या घरी रहायला गेली. सुशांतच्या अंत्यसंस्कारांवेळीही रिया त्याच्या कुटुंबियांसोबत होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YZu57r