मुंबई: बॉलीवूड अभिनेता याच्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. १४ जून रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या निधनानंतर बॉलिवूड तसेच क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटल्या, अजूनही त्या उमटत आहेत. अशाच उमटलेल्या विविध प्रतिक्रियांनंतर सुशांतनंआत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, अशी चर्चा सुरू झाली. आता अभिनेता शेखर सुमन यानं ट्विट करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शेखर सुमन यानं ट्विट केल्यानंतर त्याचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. सुशांतनं आत्महत्या केली असेल तर त्यानं एखादी चिठ्ठी नक्कीच लिहून ठेवली असले, असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'प्रचंड इच्छाशक्ती आणि हुशार असलेल्या सुशांतनं आत्महत्या केली असेल तर त्यापूर्वी त्यानं एखादी चिठ्ठी किंवा पत्र लिहून ठेवलं असतं,इतरांप्रमाणं माझ्या डोक्यातही तेच सुरू आहे. परिस्थिती दिसतेय त्यापेक्षा वेगळीही असू शकते' असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. यापूर्वी देखील शेखरनं सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात ट्विट केलं होतं. 'सुशांतच्या चाहत्यांचा आक्रोश पाहून सिनेइंडस्ट्रीतले वाघ घाबरून लपले आहेत', असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. इतकंच नाही तर त्यानं #justiceforSushantforum. ही मोहिम देखील सुरू केली आहे. दरम्यान,बिहारमधील पाटण्यात राहणारे सुशांतसिंह राजपूत याचे कुटुंबीय देखील हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचं मानत नाहीत. 'आम्हाला वाटत नाही की तो आत्महत्या करेल. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास करायला हवा. सुशांतच्या मृत्यूमागं कारस्थान असल्याचं दिसतं. त्याचीही हत्या देखील झालेली असू शकते, असं सुशांतच्या मामांचं म्हणणं आहे. गळफास घेऊन आत्महत्या ३४ वर्षांचा सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्येत होता. यावर तो उपचारही घेत होता.छोट्या पडद्यावर 'किस देश में है मेरा दिल', 'पवित्र रिश्ता' या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर 'काय पो छे' सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'राबता', 'पिके', 'छिछोरे' या सिनेमांतून त्यानं आपली अभिनयक्षमता सिद्ध करून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Z2WnxT