मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सुशांतचे चाहते त्याचे जुने आणि नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान अभिनेत्री एका छायाचित्रकारावर (फोटो जर्नलिस्ट) भडकली. त्या पत्रकाराने सुशांतसिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्यावर दीपिका भडकली. असं या छायाचित्रकाराचं नाव आहे. विरलने सुशांतच्या अंत्यसंस्काराचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. यात सुशांतचं शव स्मशानभूमीत घेऊन जाताना दिसलं. नेमकी हीच गोष्ट दीपिकाला खटकली आणि तिने सोशल मीडियावर याचा राग व्यक्त केला. सुशांतचा हा व्हिडिओ शेअर करताना विरल भयानीने लिहिले की, 'माझ्या परवानगीशिवाय कोणीही मी शेअर केलेले फोटो किंवा व्हिडिओ वापरू नये.' याच पोस्टवर आपला राग व्यक्त करत दीपिका म्हणाली की, 'ठीक आहे.. पण हा व्हिडिओ घेणं तरी योग्य आहे का? एवढंच नाही तर हा व्हिडिओ त्याच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय पोस्टही केला ते योग्य आहे का?' दीपिकाच्या या कमेन्टवर विरल भयानीने आपली प्रतिक्रिया दिली. आपलं मत मांडताना विरलने ट्वीट करत म्हटलं की, 'तुम्ही तुमच्या पार्टीसाठी लोकांना बोलावता.. पण जेव्हा त्याच व्यक्तीचं निधन होतं तेव्हा काय? ही एक स्वार्थी इण्डस्ट्री आहे. मी आतापर्यंत अनेक अंत्यसंस्कार कव्हर केले आहेत आणि रजा मुराद आणि अशोक पंडित या दोनच व्यक्ती नेहमी सन्मान देण्यासाठी येतात.' विरलने पुढे लिहिले की, 'अनेक वृत्त वाहिन्यांनी आणि इतर मीडिया हाउसने अंत्यसंस्कारचं लाइव्ह कव्हरेज केलं. त्यातील अनेकांनी तर नियमही पाळले नाहीत. पण शेवटी जेव्हा राग व्यक्त केला जातो तो फक्त छायाचित्रकारांवरच केला जातो.' आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये विरलने लिहिले की, 'मी नेहमीच टीका आणि नकारात्मकतेसाठी तयार असतो. कारण याच गोष्टी माझी मदत करतात.' 'मी एकटाच माझं सोशल मीडिया सांभाळतो. त्यामुळे माझ्याकडूनही अनेक चुका होतात. पण जेव्हा मी चुकतो तेव्हा माझे फॉलोवर्स मला याबद्दल सांगतात.' विरल भयानीने त्याच्या प्रत्येक ट्वीटमध्ये दीपिका पदुकोण आणि कंगना रणौतला टॅग केलं आहे. सध्या सोशल मीडियावर विरलच्या याच ट्वीटची चर्चा सुरू आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YwkiXz