Full Width(True/False)

सोनू निगमच्या समर्थनात धावून आला अदनान सामी

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्याने पुन्हा डोकं वर काढलं आहे. सोनू निगमने टी-सीरिजचे मालिक भूषण कुमारवर निशाणा साधत त्याला संगीतसृष्टीतील माफिया म्हटलं. या व्हिडिओमध्ये सोनू म्हणाला की, कंपनी नवीन कलाकारांना योग्य वागणूक देत नाही आणि चांगल्या कलाकारांनाही योग्य ती संधी देत नाही. यावर प्रसिद्ध गायक अदनान सामीने सोनूचं समर्थन केलं आहे. लोकांवर होतोय अन्याय- अदनान सामीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं की, 'भारतीय सिनेमा आणि संगीतसृष्टीला बदलण्याची खरंच गरज आहे. त्यातही संगीत क्षेत्रात नवीन गायक, जुने गायक, संगीत दिग्दर्शक आणि म्युझिक प्रोड्युसर यांच्यावर अन्याय होत आहे. जे तानाशाह आहेत त्यांच्या पाया पडला तरच तुम्हाला गाण्याची संधी मिळेल नाही तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल. अशा व्यक्ती क्रिएटिव्हिटीला का दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात ज्यांना स्वतःला याबद्दल काही माहीत नाही. यासोबत ते देव होण्याचा का प्रयत्न करतात?' स्वतःला देव मानतात म्युझिक माफिया अदनानने पुढे लिहिले की, 'देवाच्या कृपेने भारतात १३० कोटी लोकसंख्या आहे. आपण काय फक्त रिमिक्स एके रिमिक्सच तयार करू शकतो का? कृपा करून हे बंद करा आणि नवीन आणि जुन्या गायकांना श्वास घेऊ द्या. सिनेमा आणि म्युझिक माफिया जे स्वतःला देव मानतात त्यांनी कधी इतिहास वाचला नाही का? कला आणि क्रिएटिव्हिटीला कोणीही रोखू शकत नाही. खूप झालं, बदल इथे आहे आणि तो तुमचा दरवाजा वाजवत आहे. तुम्ही तयार असाल किंवा नाही पण तो येत आहे. स्वतःला सांभाळा.' अलिशा चिनॉयनेही दिला पाठिंबा- इन्स्टाग्रामवर गायिका अलिशा चिनॉयच्या नावावर एक अनव्हेरिफाइड अकाउंट आहे. या अकाउंटवरूनही अदनानला पाठिंबा देण्यात आला आहे. या पोस्टमध्ये लिहिले की, मुव्ही आणि म्युझिक माफिया त्यांच्या ताकदीने आणि भीतीने तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/317GCs5