Full Width(True/False)

सुशांतच्या चाहत्यांचे स्वप्न अधुरेच राहणार; 'दिल बेचारा' हॉटस्टारवर होणार प्रदर्शित

मुंबई: अभिनेता आता या जगात नसला तरी तो त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात नेहमी असणार आहे. सुशांतचा '' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचं त्यानं या जगाचा निरोप घेतला. त्यामुळं सुशांतच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खास असणार आहे. त्यांच्या आवडत्या हिरोला त्यांना चित्रपटात पाहता येणार आहे. 'दिल बेचारा' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट असल्यानं तो सिनेमागृहात पाहण्याची इच्छा मात्र आता पूर्ण होणार नाहिए. कारण, 'दिल बेचारा' पुढच्या महिन्यात हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. येत्या २४ जूलै रोजी चित्रपटाचा प्रिमियर होणार असल्याची माहिती आहे. पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी असल्याचं सांगत या चित्रपटाचं प्रदर्शन बऱ्याचदा पुढं ढकलण्यात आलं होतं. हा चित्रपट सिनेमागृहातच रिलीज करण्यात यावा अशी आग्रही मागणी चाहत्यांकडून करण्यात करण्यात येत होती. २०१४ साली आलेल्या हॉलिवूडच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार' या चित्रपटाचा 'दिल बेचारा' हा चित्रपट रिमेक आहे. सुशांतचा ‘दिल बेचारा’ ही एक प्रेमकथा असून, त्यात संजना संघी त्याची नायिका आहे. अभिनेता सैफ अली खान यानं देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जॉन ग्रीनच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समोर आलं नसलं तरी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीमुळं त्याच्यावर ही वेळ आली असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.त्यामुळं त्याचा 'दिल बेचारा' हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करण्यात यावा, 'आम्हाला आमच्या हिरोला शेवटंचं मोठ्या पडद्यावर पाहयचं आहे', असं सुशांतच्या चाहत्यांनी म्हटलं होतं. ८ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाउनमुळं हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. १४ जून रोजी ३४ वर्षांचा सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्येत होता. यावर तो उपचारही घेत होता.छोट्या पडद्यावर 'किस देश में है मेरा दिल', 'पवित्र रिश्ता' या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर 'काय पो छे' सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'राबता', 'पिके', 'छिछोरे' या सिनेमांतून त्यानं आपली अभिनयक्षमता सिद्ध करून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i7T8Oz