Full Width(True/False)

जिओच्या स्वस्त प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता, डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () आपल्या युजर्संसाठी अनेक बेस्ट प्लान ऑफर करीत आहे. कंपनीकडे असे अनेक प्लान आहेत ज्यात डेटासोबत फ्री कॉलिंग बेनिफिट दिली जात आहे. जर तुम्हालाही स्वस्त किंमतीत जास्त बेनिफिट हवा असेल तर तुम्हाला जिओच्या प्रीपेड प्लान्सवर अनेक जबरदस्त ऑप्शन मिळत आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला जिओचे काही जबरदस्त परंतु, स्वस्त प्लानसंबंधी माहिती देत आहोत. ज्यात डेटा आणि फ्री कॉलिंगसोबत अन्य बेनिफिट्स मिळतात. वाचाः जिओचा १२९ रुपयांचा प्लान २८ दिवस वैधता असलेल्या या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. ३०० फ्री एसएमएस ऑफर केली जाते. तसेच या प्लानमध्ये जिओ नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १००० मिनिट्स मिळतात. या प्लानमध्ये जियो अॅप्सचे कॉम्पलिमेंट्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. जिओचा ३२९ रुपयांचा प्लान ६ जीबी डेटा सोबत येणाऱ्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये ३००० मिनिट्स दिले जातात. १००० फ्री एसएमएस सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः जिओचा १२९९ रुपयांचा प्लान जिओचा हा प्लान ३३६ दिवसांचा आहे. २४ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये ३६०० फ्री एसएमएस सुद्धा मिळते. या प्लानमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १२००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2zSFxJz