Full Width(True/False)

आज मुंबईत होणार सुशांतसिंह राजपूतवर अंत्यसंस्कार

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांना आणि त्याला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने आत्महत्या केली यावर विश्वास बसत नाही. आत्महत्येनंतर त्याचा मृतदेश शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सुशांतचे कुटुंबिय मुंबईत दाखल झाले असून आज सोमवारी मुंबईतच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रविवारी रात्री सुशांतच्या कुटुंबियांचे विमानतळावरील फोटो समोर आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुशांतला गमावल्याचं दुःख स्पष्टपणे दिसत होतं. सुशांतचे वडील पटणावरून मुंबईला यायला निघाले असून त्यांच्यासोबत घरातील कोणती व्यक्ती येत आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. करोना व्हायरसमुळे मुंबईतच सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. वडील आणि बहिणींसाठी याहून वाईट दिवस कोणताच नसेल जेव्हा एका- एका क्षणाने त्यांना फक्त दुःख आणि वेदना दिल्या. सुशांतने आत्महत्या का केली याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं होतं. याशिवाय पोलिसांनाही सुशांतच्या घरात डिप्रेशनवर सुरू असलेल्या ट्रीटमेन्टची फाइल मिळाली. अनेक दिवसांपासून सुशांतला एकटेपणा वाटत होता आणि घरच्यांना तो स्वतःसोबत राहण्यासाठी बोलावत होता. काही दिवसांननी त्याचे बाबा त्याच्यासोबत रहायला येणार होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2AEnUxt