कल्पेशराज कुबल राज्यभर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना मनोरंजनसृष्टीतही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेषत: प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी टीव्हीविश्व कंबर कसून कामाला लागलं आहे. जवळपास अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर नव्या मालिका आणि कार्यक्रम घेऊन वाहिन्या सज्ज झाल्या आहेत. आपला प्रेक्षकवर्ग टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी वाहिन्यांमध्येही कांटे की टक्कर दिसून येणार आहे. 'आठशे खिडक्या नऊशे दारं'च्या निमित्तानं निर्माते श्रीरंग गोडबोले यांनी नवीन प्रयोग केला. कलाकारांनी घरच्या घरी चित्रीकरण करून मुख्य प्रवाहातली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. स्वप्नील मुरकर या तरुण दिग्दर्शकानं या अनोख्या मालिकेचं दिग्दर्शन करण्याचं आव्हान स्वीकारलं. कलाकार स्वतःच्या घरामध्ये चित्रीकरण करू लागले. प्रेक्षकांनादेखील हा प्रयोग भावल्याचं दिसून येतंय. या मालिकेच्या पाठोपाठ आणखी काही मालिका आणि कार्यक्रम विविध वाहिन्यांनी प्रेक्षकांसमोर आणायला सुरुवात केलीय. अभिनेता वैभव मांगले सध्या कोकणात आहे. कोकणातूनच तेथील काही स्थानिक कलाकार आणि सिनेमॅटोग्राफरना बरोबर घेत तो '' ही मर्यादित भागांची मालिका चित्रित करतोय. तसंच 'घरात बसले सारे' या आणखी एका नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून, महाराष्ट्राचे लाडके अर्धवटराव-आवडाबाई त्यांच्या कुटुंबासह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. रामदास पाध्ये आणि कुटुंबीय घरच्या-घरी या कार्यक्रमाचं चित्रीकरण करत आहेत. या आणि यांसारख्या आणखी काही मालिका उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कलाकार मंडळी चित्रित करत आहेत. लेखक आणि निर्माता तेजपाल वाघनं त्याच्या 'लागीरं झालं जी' मालिकेतील भैय्यासाहेब, टॅलेन्ट आणि राहुल्या या तिघांना घेऊन '' ही मालिका केली आहे. या मालिकेचं चित्रीकरण सातारा येथे सुरू आहे. राज्य सरकारनं आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून, अगदी निवडक कलाकार आणि स्थानिक तंत्रज्ञ मंडळींच्या सहकार्यानं चित्रीकरण केलं जातंय. या निमित्तानं स्थानिक होतकरू कलाकार आणि तंत्रज्ञांना कामाची उत्तम संधी मिळाली आहे हे विशेष. कारण, या मालिकेची निर्मिती आणि चित्रीकरणासाठी मुंबईतला चमू साताऱ्याला गेलेला नाही. दिग्दर्शकापासून कॅमेरामन, एडिटर सर्व मंडळी हे स्थानिक आहेत. 'निर्माता म्हणून ही माझी पहिलीची मालिका असून, मीच या मालिकेचं लेखन करतोय. आजवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारा किरण दळवी मालिकेचा मुख्य दिग्दर्शक आहे. माझे दोन्ही सिनेमॅटोग्राफर प्रथमेश कुलकर्णी आणि प्रशांत मांढरे यांनीही यापूर्वी कोणतीही मालिका-सिनेमा चित्रित केलेला नाही. साताऱ्यामध्ये स्थानिक विवाहसोहळ्यात व्हिडीओग्राफीचं काम ते करतात. प्रशांत हातपाकी हा एडिटरही लग्नाचे व्हिडीओ करतो. अशी आमची ही स्थानिक टीम आहे', असं तेजपालनं सांगितलं. त्याचप्रमाणे 'लाफ्टर स्टार' आणि 'लाव रे तो व्हिडीओ' यासारखे नवे कार्यक्रमदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहेत. या कार्यक्रमांच्या निमित्तानं प्रेक्षकांनादेखील यात सहभागी होऊन टीव्हीच्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळणार आहे. या सर्व मालिका आणि कार्यक्रमांची निर्मिती प्रेक्षकांना टीव्हीकडे आकर्षित करण्यासाठी केली जातेय. आहेत. अभिनेत्री मानव नाईकची निर्मिती असलेली 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिकादेखील येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीव्हीचं नवं पर्व 'आठशे खिडक्या नऊशे दारं', 'लाफ्टर स्टार', 'टोटल हुबलाक', 'एक गाव भूताचा', 'लाव रे तो व्हिडीओ', 'घरात बसले सारे', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'लॉकडाउन विशेष'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BkN43W