रिसर्च फर्म counterpoint च्या एका रिपोर्टनुसार, ३० टक्के मार्केट शेअर सोबत शाओमी भारतात नंबर वन स्मार्टफोन कंपनी आहे. शाओमीने २०२० मधील पहिल्या तिमाहीत वर्षाची ६ टक्के ग्रोथ मिळवण्यात यश मिळवले आहे. शाओमीची बजेट आणि मिड रेंज सेगमेंटमध्ये जबरदस्त पकड आहे. शाओमीच्या रेडमी नोट ८ आणि नोट ९ सीरिजला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. शाओमीची रेडमी सीरिज भारतात खूप प्रसिद्ध आहे. रेडमीचे फोन स्वस्तात मस्त मिळत असल्याने या सीरिजचे फोन पहिल्याच सेलमध्ये आऊट ऑफ स्टॉक झालेले अनेकदा दिसले आहे.
या आकडेवारीच्या माहितीनुसार, दुसऱ्या नंबरवर चीनची कंपनी विवो आहे. विवो ने आपली वाय सीरिज च्या बळावर २०२० च्या पहिल्या तिमाहित वर्षाच्या आधारावर ४० टक्के ग्रोथ मिळवली आहे. कंपनीने १७ टक्के मार्केट शेअर करीत दुसऱ्या नंबवर स्थान मिळवले आहे. शाओमी प्रमाणेच विवोच्या स्मार्टफोनला सुद्धा भारतात जबदरदस्त मागणी आहे. विवो चे फोन बजेट आणि मिड रेंजमध्ये असल्याने या फोनला मागणी आहे. विवो कंपनी सुद्धा भारतात नवीन-नवीन फोन लाँच करीत आहे. विवो कंपनीने नुकतीच आपली वाय सीरिज लाँच केली आहे. या सीरिजला भारतात उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
सॅमसंग कंपनी ही टॉप ५ मध्ये येणारी एकमेव कंपनी आहे. जी चीनची कंपनी नाही. दक्षिण कोरियाची कंपनी असलेल्या सॅमसंगच्या फोनला भारता चांगला प्रतिसाद मिळतो. दक्षिण कोरियाची कंपनी असलेल्या सॅमसंगने नुकतीच ए आणि एम सीरिज भारतात लाँच केली आहे. या दोन सीरिजच्या जोरावर सॅमसंगने अनेक मिड रेंज आणि बजेट स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने या शिवाय S10 Lite आणि Note 10 Lite यासारखे अफॉर्डेबल प्रीमियम फोन भारतात लाँच केले आहेत. सॅमसंगची भारतात १६ टक्के भागीदारी असून या यादीत सॅमसंग तिसऱ्या स्थानावर आहे.
चीनची आणखी एक कंपनी रियलमी आहे. ही कंपनी शाओमीची विरुद्ध कंपनी म्हणून ओळखली जात असली तरी ही कंपनी सुद्धा चायनीज आहे. रियलमीने कमी वेळात भारतात आपली पकड मजबूत केली आहे. रियलमीने कमी किंमतीतील Realme 5i आणि Realme C3 या सारखे फोन लाँच केलेले आहेत. या दोन्ही सीरिजला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारतात या फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असल्याने ही कंपनी चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत रियलमीचे मार्केट शेअर १६ टक्के राहिले आहे.
ओप्पो आणि विवो एकाच पॅरेंटची कंपनी आहे. चीनची आणखी एक टॉप ५ मध्ये असून ही कंपनी पाचव्या स्थानावर आहे. ओप्पोने बजेट सेगमेंटमध्ये A5 2020 आणि A5s स्मार्टफोन लाँच केले आहे. तसेच कंपनीने नुकतेच Oppo A31 आणइ Oppo A9 2020 स्मार्टफोन लाँच केले आहेत. विवो आणि ओप्पोच्या ऑफलाईन मार्केटमध्ये सुद्धा चांगली पकड आहे. ओप्पो आणि विवोचे भारतात अनेक फोन हे बजेटमधील आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय मंडळीची या फोनला जबरदस्त मागणी आहे. ओप्पो आणि विवोचे स्मार्टफोन हे अनेक तरुणांच्या हातात पाहायला मिळतात.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YHPpya