मुंबई: चीनशी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांनी जीवाची बाजी लावत पत्करल्याचं समजल्यानंतर देशभरातून या वीरांना आदरांजली वाहण्यात आली. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील तारे-तारकांनीही आपल्या भावना व्यक्त करत भारतीय जवानांना सलाम केला. महानायक यांच्यापासून आणखी अनेक कलाकारांनी, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या भावनिक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'ज़रा आँख में भर लो पानी; जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुर्बानी.' या जवानांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिलं. भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांना माझा सॅल्यूट, जय हिंद,' असं ट्विट बच्चन यांनी केलं. गलवानमधील घटनेवर 'उरी'फेम अभिनेता विकी कौशलनंही प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं ट्विटरवर भारतीय सैनिकांचं कौतुक करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे लिहितात की, 'सीमेवर शहीद होणारा प्रत्येक जवान माझ्या घरातलाच कुणीतरी आहे.' त्याबरोबरच अभिनेता अक्षयकुमार म्हणाला की, 'आपण सगळे नेहमीच या शूर जवानांच्या ऋणात राहणार आहोत.' आणखी काही अभिनेते-अभिनेत्रींनी व्यक्त केलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत. मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व शहिदांना वंदन - समीर विद्वांस, दिग्दर्शक भारतीय सीमेचं रक्षण करताना शहिद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. - सुबोध भावे, अभिनेता भारतीय सैन्याला आमचा आज आणि कायमच सलाम आहे. - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री प्रत्येक जवानाला माझा सलाम आहे. त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देत भारतीय सीमेचे स्वरक्षण केले आहे. जय जवान, जय भारत. - अजय देवगण, अभिनेता सैनिकाची मुलगी म्हणून, प्रत्येक सैनिकाचं वीरमरण नेहमीच मला दुःखदायक आणि वैयक्तिक वाटतं. त्यांच्या जीवनातला त्याग आणि त्यांचं बलिदान नेहमीच स्मरणात राहील. - अनुष्का शर्मा, अभिनेत्री शहीद जवानांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि भारतीय सीमांच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाबद्दल त्यांना मनापासून अभिवादन. - फरहान अख्तर, अभिनेता गलवान खोऱ्यामध्ये आपल्या सीमेचं रक्षण करताना भारतीय लष्करी अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. शून्य तापमानातसुद्धा आपलं सैन्यदल धैर्यानं आणि दृढनिश्चयानं चिनी आक्रमणापासून भारतीय सीमांचं रक्षण करत आहे. वीरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांना मानवंदना' - डॉ. अमोल कोल्हे, अभिनेता गलवान खोऱ्यात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय सैनिकांना सलाम. देशाच्या सन्मानासाठी तुम्ही प्राणांचं बलिदान दिलं. तुमच्या कुटुंबियांकडे मी दु:ख व्यक्त करतो. जय हिंद.- विकी कौशल, अभिनेता
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hD7ndR