Full Width(True/False)

अभिनवच्या आरोपांवर सलीम खान यांची प्रतिक्रिया

मुंबई- सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर पासून सुरू झालेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर अनेक जुनी प्रकरणं नव्याने समोर येत आहेत. अभिनव कश्यपनेही , सोहेल खान, आणि वडील यांच्यावर त्याचं करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. अभिनवने यासंबंधी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्टही शेअर केली होती. यावर सलीम खान यांची आता प्रतिक्रिया आली आहे. आधी जाऊन त्याचे सिनेमे पाहा, मग आपण बोलू- बॉम्बेटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी अभिनवने केलेल्या आरोपांना उत्तर देत म्हटलं की, 'हो आम्हीच सगळं खराब केलं आहे. तुम्ही आधी जाऊन त्याचे सिनेमे पाहा आणि मग आपण बोलू. त्याने माझंही नाव त्याच्या स्टेटमेन्टमध्ये टाकलं आहे ना.. त्याला कदाचित माझ्या वडिलांचं नाव माहीत नसेल. त्यांचं नाव आहे राशिद खान. त्याने आमच्या आजोबा आणि पणजोबांचीही नावं टाकायला हवी होती. त्याला जे बोलायचंय ते बोलू द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही.' अभिनवनं त्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? अभिनव कश्यपनं YRF म्हणजेच यशराज फिल्मच्या एजन्सीवर गंभीर आरोप केलेत. या एजन्सीमुळं कदाचीत सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचललं असं त्यानं म्हटलं आहे. या फिल्म एजन्सी नवीन कलाकारांच आयुष्य आणि करिअर उंचीवर घेऊन जाण्याऐवजी त्यांना खाली खेचण्याचं काम करतात. मला याचा अनुभव आलाय. या एजन्सीचे अलिखित कोड ऑफ कंडक्ट आहेत. एकदा का कलाकारांनी त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केलं की या एजन्सीज आपली मनमानी सुरू करतात आणि त्यांना हवं तसं वागवून घेतात, असं अभिनव म्हणाला. बॉलिवूडमधील या घराणेशाहीला मी देखील बळी पडलो असून‘दबंग’सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतरही माझा संघर्ष संपला नाहीए. 'दबंग-२'मधून मला बाहेर काढण्यात आलं. याबद्दल मी बोललो त्यामुळं माझी नकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी खान कुटुंबानं अनेक प्रयत्न केले. शिवाय मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली. अष्टविनायक फिल्म्स, वायाकॉम पिक्चर्स यांसारख्या अनेक कंपनींसोबत केलेले करार रातोरात मोडले गेले होते. आर्थिक नुकसान तर झालंच परंतु गेल्या दहा वर्षातं मानसिक त्रासही झाला. आता मला माझे शत्रू कोण हे चांगलं कळालं आहे. सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान हे तर आहेतच. परंतु या विषारी तलावात काही छोटे मासेही आहेत. परंतु खान कुटुंबिय पैशाचा, राजकीय ताकद आणि अंडरवर्ल्डचा वापर करून कोणालाही घाबरवू शकतात, असे थेट आरोप अभिनवनं केलं आहेत. मला आशा आहे की, सुशांत जिथं असेल तिथं आनंदी असेल. पण यापुढं कोणत्याही निष्पाप कलाकाराला बॉलिवूडमध्ये आत्मसन्मानानं काम मिळालं नाही म्हणून जीव द्यावा लागणार नाही, असं अभिनव यांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2N5YStI