Full Width(True/False)

शूटिंग थांबल्यानं मराठी कलाकारांवर मासे-दूधविक्री करण्याची वेळ

मुंबई: लॉकडाउनमुळे अनेकांची आर्थिक गणितं कोलमडली. मनोरंजनसृष्टीतही अनेक तरुण कलाकारांच्या हातचं काम गेलं. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी आणि या दोन तरुण कलाकारांवर दूधविक्री, मासेविक्री, कांदे-बटाट्यांची विक्री करण्याची वेळ आली आहे. या कठीण काळात हे छोटे-मोठे व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. रोहन आणि प्रसाद या दोघांनी सुरुवातीला एकांकिका-नाटकांत काम केलं आहे. नंतर मालिका आणि चित्रपटांतून त्यांना छोट्या-मोठ्या भूमिका मिळत गेल्या. रोहन 'साथ दे तू मला' या मालिकेत तर प्रसाद 'भेटी लागी जीवा' या मालिकेत दिसला होता. मिळेल ती भूमिका करणारे हे कलाकार सध्या मात्र दूधविक्री आणि मासेविक्री करत आहेत. रोहन पेडणेकरच्या वडिलांचा सुके मासे विकण्याचा व्यवसाय होता. रोहननं तोच पुन्हा सुरू केला आहे. दादर-बोरिवलीदरम्यान तो घरपोच मासे देतो. कल्याणमध्ये राहणारा प्रसाद गेल्या २ महिन्यांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी दूधविक्री करू लागला. दूधविक्रीच्या व्यवसायात त्याला तोटा सहन करावा लागत असून, त्यामुळे तो कांदे-बटाटे विकण्याचा व्यवसाय सुरू करतो आहे. मनोरंजनसृष्टी सुरू होईल तेव्हा होईल. मात्र तोपर्यंत उपजीविकेसाठी काही ना काही करणं भाग होतं. आम्ही कलाकार छोटे असलो, तरी आमच्या कलेला किंमत आहे हे आम्ही जाणतो. यापुढे नाटक-मालिका-सिनेमा यांचं चित्र बदलणार आहे. त्यावेळी काम मिळेल की नाही अशी शंका आहे. उपजीविकेसाठी आम्ही हे व्यवसाय करत आहोत. पुढे जर वेळ आली, तर आम्हाला हा व्यवसाय असाच सुरू ठेवावा लागेल. -प्रसाद दाणी


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UTM2D7