Full Width(True/False)

सॅमसंग गॅलेक्सी A21s फोन झाला स्वस्त, नवी किंमत पाहा

नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात आपला गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने फोनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आधी इतकीच आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. या फोनला जून मध्ये लाँच करण्यात आले होते. फोनमध्ये चार रियर कॅमेरे, 15W फ़ास्ट चार्जिंग सोबत 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः फोनची किंमत या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर ६ जीबी रॅम फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत १८ हजार ४९९ रुपये होती. तर ४ जीबी रॅम फोनची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे. या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती मुंबईचे रिटेलर महेश टेलिकॉमने ट्विटरवर दिली आहे. कंपनीने अधिकृतपणे या कपातीची घोषणा केली नाही. वाचाः चे वैशिष्ट्ये सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1,600 पिक्सल आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. या फोनमध्ये ऑक्टाकोर Exynos 850 प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम पर्यंत तसेच ६४ जीबी स्टोरेज मिळतो. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर सेटअप दिला आहे. वाचाः रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स मिळतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच फास्ट चार्जिंग साठी 15W फ़ास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39fQu52