Full Width(True/False)

सॅमसंगची जबरदस्त ऑफर, ऑनलाइन शॉपिंगवर २० हजारांपर्यंत फायदा

नवी दिल्लीः भारतातील ऑनलाइन बाजारात आपली स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी सॅमसंगने नवीन ऑफर आणली आहे. यात सॅमसंग रेफरल प्रोग्राम, सॅमसंग स्टूडेंट प्रोग्राम आणि सॅमसंग शॉपवर २० हजार रुपयांपर्यंत फायदे युजर्संना मिळणार आहेत. कंपनीने या ऑफर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त युजर्संना आपल्या ऑनलाइन स्टोरकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनीला आपला १० टक्के बिझनेस ऑनलाइन करायचे आहे. वाचाः सॅमसंग रेफरल प्रोग्राम: ८ टक्क्यांपर्यंत फायदा हा प्रोग्राम या ग्राहकांसाठी आहे. जे आधीपासून सॅमसंगच्या डिव्हाईसचा वापर करीत आहेत. या ऑफर अंतर्गत सॅमसंग डिव्हाईस युजर्स कोणत्याही अन्य ग्राहकांनाना प्रोडक्ट रेफर करतील. यात त्यांना सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर वरून खरेदी केल्यास ८ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. ही ऑफर स्मार्टफोन, टेबलेट्स आणि व्हियरेबल्स यासारख्या १५ प्रोडक्ट्सवर मिळणार आहे. वाचाः सॅमसंग शॉपवर २० हजार रुपयांपर्यंत फायदे सॅमसंग आपल्या अॅपवर २० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स देत आहे. ही ऑफर ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. या ऑफर अंतर्गत युजर १० शॉपिंग व्हाऊचर अनलॉक करू शकतील. या १० व्हाऊचर मध्ये युजर्संना २० हजार रुपयांपर्यंत शॉपिंग व्हॅल्यू मिळणार आहे. यासाठी तुम्हाला सॅमसंग शॉप अॅप वर आपला कॉन्टॅक्ट डिटेल रजिस्टर करावा लागेल. या ऑफर अंतर्गत मिळणाऱ्या व्हाऊचर कॅटेगरी वेगळी आहे. यात स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव, टेबलेट, स्मार्टवॉच, वायरलेस ऑड़ियो यासारख्या प्रोडक्टचा समावेश आहे. हे व्हाऊचर ३६५ दिवसांसाठी वैध आहे. वाचाः सॅमसंग भारतात आपली मार्केट वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनी आपला बिझनेसचा १० टक्के भाग ऑनलाइन सेगमेंटमध्ये लावणार आहे. या अंतर्गत कंपनी नवीन ऑफर्स द्वारे जास्तीत जास्त युजर्संना जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. ही ऑफर सुद्धा कंपनीच्या या रणनीतीचा एक भाग आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3134483