Full Width(True/False)

तारीख ठरली! राणा डग्गुबतीने सांगितली पूर्ण तयारी

चैन्नई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांमध्ये अभिनेता राणा डग्गुबतीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. लॉकडाउनमध्ये त्याने गर्लफ्रेंड मिहिका बजाजशी साखरपुडा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. आता राणाने एका मुलाखतीत लग्नासंबंधीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. राणा म्हणाला की, 'मला माझं खासगी आयुष्य खासगीच ठेवायला आवडतं. पण माझं मिहिकावर खूप प्रेम आहे आणि आमची जोडीही चांगली आहे. मिहिका माझ्या घरापासून तीन किमी लांब तिच्या कुटुंबासोबत राहते.लॉकडाउनमध्ये जेव्हा आम्ही साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा आम्हाला फार कष्ट करावे लागले नव्हते. आम्ही दोघं ८ ऑगस्टला लग्न करणार आहोत. साखरपुड्याप्रमाणे लग्नही खासगी पद्धतीनेच करणार आहोत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण असेल.' राणा पुढे म्हणाला की, 'हिंदी, तेलगू, तमिळ किंवा कोणतीही भाषा असो.. सिनेमा निवडण्यासाठी माझ्यासाठी त्याची कथा महत्त्वाची असते. माझा पहिला सिनेमा 'लिडर' हा एक पॉलिटिकल ड्रामा होता तर दुसरा सिनेमा 'दम मारो दम' गोव्यात अमली पदार्थ विकणाऱ्याच्या भोवती राणा डग्गुबतीने 'बाहुबली' सिनेमाच्या प्रवासाला आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक मानले. 'या सिनेमाला सहा वर्ष पूर्ण झाली. या सिनेमाच्या प्रवासाने खूप काही शिकवलं आणि आम्हाला प्रसिद्धीही दिली. आम्हाला कळलं की जर विषय योग्य असेल तर त्याला त्याचं यश पक्क मिळतं.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g26cDj