Full Width(True/False)

महेश भट्ट आणि करण जोहरच्या मॅनेजरची होणार चौकशी

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या चौकशीत मुंबई पोलिसांनी जबाब घेण्याचा तगादा लावला आहे. आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीनंतर आता पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि यांच्या मॅनेजरांना सोमवारी २७ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला आहे. या चौकशीत सुशांतच्या आत्महत्येशी निगडीत अनेक प्रश्न विचारण्यात येतील. यासंबंधी माहिती देताना देशमुख म्हणाले की, महेश यांच्याशिवाय करणच्या मॅनेजरलाही चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच गरज पडली तर करण जोहरचीही चौकशी करण्यात येईल. तसेच सिनेसृष्टीत सुशांतविरोधात कोणी गटबाजी केली याची चौकशी करण्यात येणार आहे. याआधी पोलिसांनी प्रसिद्ध सिनेसमीक्षक राजीव मसंदची चौकशी केली होती आणि त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. याआधी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेही भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. नेमकी सुशांतने एवढं टोकाचं पाऊल का उचललं या प्रश्नाचं उत्तर तिलाही हवं आहे. दरम्यान, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड देखील त्याचा दिल बेचारा हा अखेरचा चित्रपट पाहण्यावाचून स्वत:ला रोखू शकली नाही. सुशांतच्या अखेरच्या चित्रपटाबद्दल तिनं एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. पवित्र रिश्ता ते दिल बेचारा...! एकदा शेवटचं....असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुशांतच्या निधनापूर्वीची अंकिता आणि सध्याची अंकिता याच्यात खूपच फरक असल्याचं चाहते म्हणतातयत. सतत सोशल मीडियावर काही तरी पोस्ट करणारी अंकिता अचानक आता गप्प झाली. तिनं गेल्या महिन्यापासून तीन पोस्ट शेअर केल्या, त्या देखील सुशांतसाठीच आहेत. त्यामुळं तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी आणखी वेळ हवा आहे, असं तिच्या जवळच्या मैत्रिणीनं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2COolX1