Full Width(True/False)

३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले महाराजांचे स्वयंघोषित मावळे... केतकी चितळेची पोस्ट

मुंबई: एका शोदरम्यान यांच्यावर केलेल्या थट्टेमुळं सध्या वाद निर्माण झाला असून या वादात आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिनं उडी घेतली आहे. फेसबुकवर पोस्ट करत तिनं शिवप्रेमींवर टीका केली आहे. कॉमेडीयन हिनं शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं समस्त शिवप्रेमींच्या व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. तसंच अनेक राजकीय नेत्यांनी देखील तिला अटक करावी अशी मागणी केली होती. याच संदर्भात केतकीनं फेसबुक पोस्ट करत नवीन वाद निर्माण केलाय. ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात, असं तिनं म्हटलं आहे. काय म्हटलं आहे केतकीनं ? शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!सोशल मिडीयावर 'मराठी' असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका. दरम्यान, अग्रिमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ती काम करत असलेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली आहे.मनसेनं दणका दिल्यानंतर अग्रिमा जोशुआनं लेखी माफिनामा सादर केला आहे. जोशुआनं तिच्या ट्विटर अकाउंटवरुनही जाहीर माफी मागितली आहे. तसंच तो व्हिडिओही हटवण्यात आला आहे. हिनं ट्विटकरत तमाम शिवभक्तांची माफी मागितली आहे. ' थोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्तांची मनं दुखावल्यानं मी त्यांची मनापासून माफी मागते. तसंच तो व्हिडिओही हटवण्यात आला आहे.'असं तिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/301M11w