Full Width(True/False)

'दिशा नसली तरी आमचं काही अडत नाही; दयाबेन नसतानाही मालिका सुरुच आहे'

मुंबई:‘’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली. त्यात दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीनं प्रसूती रजेनंतर या मालिकेचा निरोप घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेपासून दूर असलेली अर्थात पुन्हा एकदा मालिकेत झळकणार की नाही हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात होतं. आता यावर खुद्द मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मौन सोडत मोठं विधान केलं आहे. लोकप्रियतेचे उच्चांक गाठणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला आज, २८ जुलैला बारा वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्तानं मालिकेच्या निर्मात्यांनी दिलेल्या मुलाखतीत दिशा वकानी हिच्या कमबॅकवर मोठाखुलासा केलाय. गोकुळधाममधला जेठालाल, गरबाक्वीन दयाबेन, कडक शिस्तीचे भिडे मास्तर, 'दुनिया हिला दूंगा' म्हणणारा पत्रकार पोपटलाल, खोडकर टप्पू, अय्यर, डॉ. हाथी, सोढी ही सगळी पात्रं आज प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनली आहेत. पण मालिका कोणत्याही एका कलाकारामुळं यशस्वी होत नाही त्यामुळं संपूर्ण टीम मेहनत घेत असते, अशी प्रतिक्रिया असितकुमार मोदी यांनी दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या कमबॅकवर दिली आहे. मालिकेत परत येण्यासाठी आम्ही अनेकदा विनंती केली आहे. अद्यापही तिनं यावर तिची प्रतिक्रिया दिली नाही. तिला मालिकेत याचं असेल तर स्वागतच आहे, पण नाही आली तरी आमचं काही अडत नाही. ती नसताना देखील मालिका गेली दोन-अडीच वर्षापासून सुरूच आहे, तिची कमतरता जानवली नाही', असंही असितकुमार मोदी यांनी म्हटलं आहे. सोपे शब्द, निखळ विनोद आणि भावनांचा नेमकेपणा ही तारक मेहता यांच्या लिखाणाची खास शैली आहे. त्यामुळेच या मालिकेनं गेली बारा वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र जर कोणती मालिका पाहत असेल तर ती 'तारक मेहता...' आहे. मालिकेतील चंपकलाल गडा, जेठालाल, दयाबेन, टप्पू, सोढी, भिडे यासारख्या भूमिकांना अजरामर करण्यामागे लेखक तारकजींच्या लेखणीचा खूप मोठा हात आहे. बारा वर्षांपूर्वी या कलाकारांची निवड करण्याची प्रक्रिया खूप अवघड होती. निर्माता म्हणून माझा एकच अट्टाहास होता की, संबंधित कलाकाराने अधिकाधिक वेळ मालिकेला द्यावा. दिलीप जोशी यांच्यासोबत मी अगोदरही काम केलं होतं. इतर सर्व कलाकार तेव्हा नवे होते. अय्यरची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे हे आमच्याकडे लेखक म्हणून आले होते. पण, त्यांच्याकडे पाहून आम्ही त्याला भूमिका देऊ केली. मालिकेतील बहुतांश कलाकार हे रंगभूमीवरून आलेले आहेत. अमित भट्ट, दिशा वखानी, मंदार चांदवडकर, सोनालिका जोशी, श्याम चव्हाण आदी अनेक कलाकारांच्या अभिनयाचा पाया हा रंगभूमी असल्यानं त्यांनी मालिकेलाही नाटकाचं रूप देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मनोरंजनात केवळ रंजन नव्हतं, तर प्रबोधनदेखील होतं. लॉकडाउनमुळे गेल्या बारा वर्षांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कालावधीसाठी मालिकेचं चित्रीकरण बंद होतं. पण, आता सुरक्षेची खबरदारी घेत आमचं चित्रीकरण सुरू आहे. असं देखील असितकुमार मोदी यांनी म्हटलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/332lc0k