मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघींनाही घरी पाठवण्यात आले आहे. दोघींच्या प्रकृतीत सुधार आलेला पाहून यांना आपले अश्रू रोखता आले नाही. त्यांनी ट्वीट करून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं की जाता जात आराध्याने त्यांचं सांत्वन केलं आणि तेही लवकर घरी परततली असंही सांगितलं. आराध्याने मारली मिठी बिग बी यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं की, 'त्या घरी गेल्या. करोनाच्या लागणपासून त्यांची मुक्तता झाली. त्यांना पाहून नकळत माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आराध्याने मला मिठी मारली आणि म्हणाली की, रडू नका.. तुम्हीही लवकर घरी याल.. मला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे.' अभिषेक बच्चननेही केलं ट्वीट यानेही यासंबंधीचं ट्वीट करून माहिती दिली. पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याने हेही लिहिलं की त्या दोघी घरी गेल्या असल्या तरी तो आणि वडील अमिताभ अजूनही इस्पितळात उपचार घेत आहेत. जया बच्चन आहेत सुरक्षित अमिताभ यांनी ११ जुलैला त्यांना आणि अभिषेकला करोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी १२ जुलैला ऐश्वर्या आणि आराध्याही पॉझिटिव्ह असल्याचं कळलं होतं. फक्त जया बच्चन यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BGYoIw