मुंबई- करण जोहर, बोनी कपूर आणि आमिर खान यांच्या घरी काम करणारे कर्मचारी निघाल्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री यांचा सिक्युरिटी गार्ड करोना पॉझिटिव्ह निघाला आहे. यानंतर बीएमसीने केला आहे. बंगल्याच्या बाहेर नोटीस लावून बंगल्याला करोना कन्टेनमेन्ट झोन घोषित केला आहे. रेखा यांचा हा बंगला वांद्रे येथील बँडस्टॅण्ड एरियामध्ये आहे. रिपोर्टनुसार, रेखा यांच्या घराबाहेर नेहमी दोन सिक्योरिटी गार्ड असतात. यातील एक गार्ड करोनाग्रस्त झाला आहे. सध्या त्याच्यावर बीकेसीतील एका इस्पितळात उपचार सुरू आहेत. यानंतर बीएमसीने संपूर्ण परिसर सॅनिटाइज केला. मात्र रेखा यांच्या प्रवक्त्याकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. गेल्या महिन्यातच आमिर खानच्या घरातील सात कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. यात आमिरचे दोन अंगरक्षक आणि एक स्वयंपाकीही होता. यानंतर आमिरच्या संपूर्ण कुटुंबाची करोना टेस्ट करण्यात आली होती. यात त्याचे घरातील सदस्य निगेटिव्ह आले होते. याआधी करण जोहर आणि बोनी कपूर यांच्या घरातील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OgbHCc