मुंबई- मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस सर्वतोपरि प्रयत्न करताना दिसत आहेत. १४ जून रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी ३५ जणांहून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. शुक्रवारी १० जुलै रोजी पोलिसांनी बॉलिवूडमधील टॉप टॅलेन्ट मॅनेजर चाही जबाब नोंदवून घेतला. रेश्मा ची एक्स मॅनेजर आहे. रेश्माची झाली पाच तास चौकशी 'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी रेश्माची जवळपास ५ तास चौकशी केली. मात्र रेश्माने आपल्या जबाबात काय सांगितले हे अद्याप कळू शकले नाही. रेश्माचा जबाब या प्रकरण फार महत्त्वपूर्ण आहे. कारण तिने सलमानशिवाय , संजय दत्त आणि आलिया भट्टची मॅनेजर म्हणून काम केले आहे. नैराश्याचं नक्की कारण काय होतं? सुशांतसिंह राजपूत नैराश्यग्रस्त होता आणि यावर तो उपचारही घेत होता हे स्प्पष्ट झालं आहे. सुशांतच्या नैराश्याची कारणं पोलीस शोधून काढत आहेत. घराणेशाहीचा मुद्दाही यात तपासला जात आहे. पोलीस यशराज फिल्म्सच्या अधिकाऱ्यांपासून ते दिग्दर्शक संजय लीला भन्साळींपर्यंत अनेकांची चौकशी करत आहे. रेश्माची आहे टॅलेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी- रेश्मा शेट्टी हे बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. सेलिब्रिटींच्या फिल्मी शेड्यूलपासून ते त्यांच्या ब्रॅण्ड एन्डॉर्समेन्टपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या ती स्वतः सांभाळते. तिची स्वतःची टॅलेन्ट कंपनीही आहे. या कंपनीचं नाव 'मॅट्रीक्स' असं आहे. २००९-१० मध्ये रेश्मा सलमानसोबत काम करू लागली. यानंतरच सलमानचं करिअर नव्या उंचीवर जाऊन पोहोचलं. सलमानच्या बीइंग ह्यूमन कॅम्पेनची कल्पनाही रेश्मा शेट्टीचीच होती. एवढंच नाही तर बिग बॉससारख्या शोचा सल्लाही रेश्मानेच सलमानला दिला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gNEyKl