Full Width(True/False)

... म्हणून मुंबईल पोलिसांनी पुन्हा एकदा मानले रोहित शेट्टीचे आभार!

मुंबई: करोनाच्या संकटकाळात देशभरातील पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. मुंबईतील पोलिसांवरही कामाचा प्रचंड ताण आहे. याच पोलिसांच्या मदतीला चित्रपट दिग्दर्शक धावून आला आहे. दिवसरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी रोहित शेट्टी यांनी शहरात ११ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. त्याच्या या मदतीसाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत. कामावर असलेले मात्र विश्रांतीची गरज असलेले पोलिस या हॉटेल्समध्ये जाऊन थोडा आराम करू शकतात. या हॉटेल्समध्ये पोलिसांच्या नाश्ता आणि जेवणाची सोयही रोहितने केली आहे. सध्या रोहित शेट्टी यांनी केलेल्या कामाबाबत त्याचे सर्व स्तरांतून कौतूक करण्यात येते आहे. यापूर्वी रोहितने 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'ला ५१ लाखांची मदत केली होती. मुंबईचे परमवीर सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत. 'या करोनाच्या संकटात खाकी वर्दीतल्या योद्धांना मदतीचा हात दिल्याबद्दल धन्यवाद', असं त्यांनी म्हटलं आहे. ट्रेंडमध्ये आला रोहित शेट्टी.... कुख्यात गुंड काल एनकाउन्टरमध्ये मारला गेल्यानंतर बॉलिवूड ट्रेण्डमध्ये आला आहे. रोहितच्या अनेक सिनेमांमध्ये पोलीस आणि गुंडांमधली चकमक दाखवण्यात आली आहेत. अनेक सिनेमात एनकाउन्टरही दाखवण्यात आले आहे. याचमुळं विकासचं एनकाउन्टर हे रोहित शेट्टीच्या सिनेमातील अॅक्शन सीनसारखं असल्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ट्विटरवर अनेक युझर्सने रोहितचे सिनेमे आणि विकास दुबेचं एनकाउन्टर यांचा संबंध दाखवला आहे. एका युझरने लिहिले की, 'आता रोहित शेट्टी बोलत असेल ही तर माझ्याच सिनेमाची कथा आहे...' दुसऱ्या युझरने एएनआयने शेअर केलेल्या ट्वीटला रिप्लाय देत म्हटलं, 'ज्या पद्धतीने गाडी उलटी झाली, मला वाटतं की रोहित शेट्टीला या स्क्रिप्टसाठी बोलावण्यात आलं होतं.' अजून एका युझरने रोहितसोबत अनुराग कश्यपचं नाव टॅग करत लिहिले की, 'विकास दुबेवर सिनेमा तयार केला तर रोहित शेट्टी त्याला खलनायक करेल आणि त्याला स्वतःच्या सिनेमात हिरो करेल.' तसेच अजून एका युझरने लिहिले की, 'मला वाटतं आज रोहित शेट्टी सर्वात आनंदी माणूस असेल. तो सूर्यवंशीचा पुढील भागही तयार करू शकतो. मस्त फिल्मी एनकाउन्टर होतं... शाब्बास पोलीस...'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fm9O2N