Full Width(True/False)

'या' सिनेमात राधिका आपटे दिसणार ब्रिटिश गुप्तहेराच्या भूमिकेत

मुंबई टाइम्स टीम आपल्या उत्कृष्ट अभिनयानं विविध व्यक्तिरेखा जिवंत करणारी गुणवान अभिनेत्री अशी राधिका आपटेची ()ओळख आहे. अशाच एका आगामी '' () या आंतरराष्ट्रीय सिनेमात राधिका लवकरच दिसणार आहे. 'ए कॉल टू स्पाय'ची कहाणी वास्तववादी आहे. ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खान ही व्यक्तिरेखा तिनं यात साकारली आहे. भूमिकेसाठी राधिकानं खूप मेहनत घेतली असून, हवा तसा परफेक्ट लुक मिळवण्यासाठी आणि आपली व्यक्तिरेखा अस्सल दिसावी यासाठी तिनं आपले केसदेखील कापून घेतले आहेत. राधिकाला ऑन-स्क्रीन बघणं ही तिच्या चाहत्यांसाठी नेहमी पर्वणी ठरत आलेली आहे. आपल्या व्यक्तिरेखेसोबत नेहमीच नवं काहीतरी घेऊन येते. राधिकाची ही व्यक्तिरेखा युद्धात लढणाऱ्या एका शांतताप्रेमी मुलीची आहे. रशियामध्ये एका अमेरिकन स्त्रीच्या पोटी जन्मलेली ही एक ब्रिटिश मुलगी आहे. तिचे वडील फ्रान्समध्ये राहणारे भारतीय मुस्लिम आहेत. पंतप्रधान चर्चिल यांच्या गुप्तचर संघटनेचा नूर या एक भाग होत्या. मेडेलीन या नावानं त्या ओळखल्या जात होत्या. पुढे त्या पकडल्या गेल्या. प्राण सोडण्यापूर्वी त्यांनी उच्चारलेला शेवटचा शब्द होता 'लिबर्टी'. दिग्दर्शक लिडिया डीन पायल्चरनं राधिकाला ही सर्व माहिती दिली. युद्धाविषयी बोललं जातं तेव्हा त्यातले नायक हे बहुतांश पुरुष असतात. मात्र बऱ्याचशा स्त्रियादेखील महायुद्धात सहभागी होऊन लढल्या आहेत. त्यांच्या न सांगितल्या गेलेल्या कहाण्या लिडिया त्यांच्या चित्रपटातून सर्वांसमोर आणणार आहे. दिग्दर्शनात पाऊल अभिनयात ठसा उमटवणारी राधिका आता दिग्दर्शनातही आपली छाप पाडू पाहतेय. राधिकानं 'स्लीपवॉकर' (sleepwalkers) या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. तिच्या या शॉर्टफिल्मची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. 'पाल्म्स स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिव्हल'मध्ये तिच्या या शॉर्ट फिल्मला पुरस्कार जाहीर झालाय. या लघुपटाला 'बेस्ट मिडनाइट शॉर्ट पुरस्कार' मिळाला असून, या लघुपटासाठी कथालेखनही तिनं केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिका म्हणाली, की 'शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाच्या कामाचा मी खूप आनंद घेतला. मी याबद्दल खूपच उत्सुक आहे. प्रेक्षकांना ही शॉर्टफिल्म लवकरच पाहता येणार आहे. दिग्दर्शक म्हणून मला आणखी काम करण्याची संधी मिळेल.' या लघुपटात शहाना गोस्वामी आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38Olrx6