मुंबई: स्टँड-अप कॉमेडियन हिनं शिवरायांवरील केलेल्या थट्टेमुळं शिवप्रेमींनी तिला चांगलंच थारेवर धरलं होतं. यानंतर या प्रकरणात मराठी अभिनेत्री हिनं उडी घेतल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केतकी चितळेनं फेसबुक पोस्ट करत शिवप्रेमींवर टीका केल्यानंतर दिग्दर्शक महेश यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत चांगलंच सुनावलं आहे. तीन वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वयंघोषित मावळे महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात, असं केतकी चितळेनं तिच्या पोस्टमध्ये लिहलं आहे. केतकीच्या या फेसबुक पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उडवली होती. त्यातच महेश टिळेकर यांनी केतकीला खडेबोल सुनावत अनेक प्रश्न विचारले आहेत. काय म्हणाले महेश टिळेकर? केतकी चितळे हिनं समाजात तसंच तरुणांमध्ये द्वेष निर्माण होईल अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.मी केतकीला हे विचारतोय की,जेव्हा महाराष्ट्रात मोठी संकटं येतात, पूर येतो किंवा या करोनाच्या काळात ही तरुण मुलं शिवरायांची मावळे म्हणून कामं करतात. तेव्हा तू त्यांचं कौतुक केलं का? किंवा स्वत: तरी काय केलं का? या तरुणांना नावं ठेवायचा तिला काय अधिकार आहे?, असा सवाल टिळेकर यांनी केलाय. सैराटमध्ये रिंकूच्या जागी केतकी असती तर तिनं त्याचा फायदा करुन घेतलाच असता. असंही टिशेकर म्हणाले. तसंच काहीमहिन्यांपूर्वी विशिष्ट दिवशी त्या समाजातील लोकं मोफत प्रवास असतो म्हणून मुंबईला येतात असा आरोप केला होता.मग आता बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले यांनी लिहिलेल्या साहित्यांचा अभ्यास कोण करणार, असा सवाल करत त्यांच्याविषयी इतका कळवळा, प्रेम, आदर कुठून आला? असा प्रश्नही टिळेकर यांनी केतकीला विचारला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Oh8gv6