मुंबई- हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेराबाबतीत () एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, Glee फेम अभिनेत्री कॅलिफोर्नियातील पीरू या लेककडून बेपत्ता झाली आहे. तुर्तास ती तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना बुधवारी तिची होडी लेक काठी मिळाली होती. यात तिचा चार वर्षांचा मुलगा झोपला होता. त्याने पोलिसांना सांगितलं की, नाया रिवेराने पाण्यात उडी मारली होती. पण ती वर परत आली नाही. सध्या तिला शोधण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पीरू लेककडून एक फोन आला होता. एका महिला आणि तिच्या मुलाने तीन तासांसाठी होडी भाड्याने घेतली होती. पण तीन तास उलटून गेल्यावरही ते परत आले नाही. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. नाया रिवेराला तिच्या Glee या टीव्ही सीरिजसाठी ओळखले जात. २००९ ते २०१५ या काळात ही सीरिज सुरू होती. नायाने ७ जुलै रोजी मुलासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात ती आपल्या मुलासोबत दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले होते की, 'फक्त आम्ही दोघं..' ३३ वर्षांची आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38CX85c