Full Width(True/False)

सुशांतचा 'दिल बेचारा'...पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

कल्पेशराज कुबलkalpeshraj.kubal@gmail.com याचे अचानक निघून जाणे सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारे होते. दिवंगत सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा हा शेवटचा सिनेमा असल्याने; 'दिल बेचारा'कडे सर्वांचेचे डोळे लागून राहिले होते. हा सिनेमा पाहिल्यावर नक्कीच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही. कारण, संपूर्ण सिनेमाभर सुशांतच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य डोळ्यात आणि मनात खोलवर घर करुन राहते. 'दिल बेचारा' हा सिनेमा कथारूपी एका प्रेम कहाणीची शोकांतिका आहे. हॉलिवूड सिनेमा 'द फॉल्ट इन अवर स्टार्स'चा 'दिल बेचारा' हा हिंदी रिमेक आहे. मुळात लेखक जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' नावाच्याच कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. एक था राजा, एक थी रानी... दोनों मर गए... खत्म कहानी; अशा संवादाने सुरु होणार हा सिनेमा प्रेमाची आणि जीवनाची नवी परिभाषा आपल्यासमोर मांडतो. कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांचा हा पहिलावहिला दिग्दर्शकीय सिनेमा आहे. दिग्दर्शकीय पातळीवर मुकेशने सिनेमात उत्कृष्ट पद्धतीने मानवी भावभावनांचा लेखाजोखा मांडला आहे. शशांक खैतान आणि सुप्रोतीम सेनगुप्ता यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. प्रथमदर्शी या सिनेमाची गोष्ट ही कीझी बासू (संजना सांघी) या मुली भोवती फिरते. कीझी ही कर्करोगाने ग्रस्त असून नेहमी तिला श्वास घेण्यासाठी ऑक्सीजन गॅस सिलेंडर स्वतःसोबत बाळगावा लागतो. मृत्यूच्या वाटेवर असणाऱ्या कीझीच्या जीवनात मॅनी अर्थात इमॅन्युएल राजकुमार ज्युनियर (सुशांत सिंह राजपूत) हा तरुण येतो. इतर सर्व प्रेमकहाणी प्रमाणे मुलगी पहिल्यांदा मुलाकडे दुर्लक्ष करते. पण, शब्दाला शब्द वाढतो आणि ते मित्र होतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. मॅनी देखील कर्करोगाशी लढत असतो. तो देखील मृत्यूच्या वाटेवर असतो; परंतु मनसोक्त जगण्याची भावना त्याच्या मनात असते जी तो कीझीच्या मनात देखील जगण्याची ज्योत प्रज्वलत ठेवतो. सुपरस्टार रजनीकांतचा फॅन असलेला मॅनीला आपल्या मित्रांसोबत एक सिनेमा बनवायचा असतो. या सिनेमाची नायिका म्हणून तो कीझीला काम करायला सांगतो. मॅनीच्या येण्याने कीझी देखील जीवनाकडे नव्या महत्वकांक्षी नजरेने पाहू लागली आहे. मॅनी प्रमाणे कीझीचे देखील एक स्वप्न आहे. जे तिला पूर्ण करायचंय. आता हे स्वप्न काय आहे? ते पूर्ण होतं का? मॅनी देखील स्वतःचा सिनेमा चित्रित करतो का? कीझी आणि मॅनीच्या प्रेमाचे पुढे काय होते. मृत्यू त्यांच्या प्रेमाआड येतो का? यासगळ्या प्रश्नांची भावनीय उत्तर तुम्हाला सिनेमात मिळतील. नवं चैतन्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा कथारूपी जितका जिवंत आहे तितकाच तो सांगीतिक दृष्ट्या देखील अव्वल आहे. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या सुरांनी सिनेमाला अक्षरशः जिवंत केले आहे. अभिनेत्री संजना सांघी हिने कीझी ही व्यक्तिरेखा अत्यंत बारकाईने साकारली आहे. तिच्या डोळ्यातील भाव भूमिकेला न्याय देणारे आहेत. सिनेमाच्या पहिल्या फ्रेम पाहून ते उत्तरार्धापर्यंत चेहऱ्यावर स्मित हास्य कायम ठवणारा मॅनी अर्थात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्याला कधी हसवतो तर कधी रडवतो देखील. मॅनी व्यक्तिरेखा त्याने निरागसपणा निभावली आहे. आपण मृत्यूच्या वाटेवर आहोत हे माहिती असून देखील शारीरिक दुखणं बाजूला सारून मनाला समाधान देणारा मॅनी त्याने उत्कृष्ट रित्या साकारला आहे. आज सुशांत प्रत्यक्षात जरी आपल्यात नसला तरी मॅनीच्या रुपातील सुशांत यापुढे नेहमी आपल्या सोबत असणार आहे. सिनेमा : दिल बेचारा निर्मिती : फॉक्स स्टार स्टुडिओ दिग्दर्शक : मुकेश छाब्रा पटकथा : शशांक खैतान आणि सुप्रोतीम सेनगुप्ता कलाकार : सुशांत सिंह राजपूत, संजना सांघी संगीत : ए. आर. रेहमान ओटीटी : डिजनी प्लस हॉटस्टार दर्जा : तीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39skdbh