Full Width(True/False)

कोण आहे स्टिव्ह हफ, ज्याने सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा केला दावा

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला महिना लोटला. पण त्याच्या मृत्यूबद्दल अजूनही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. अमेरिकी पॅरानॉर्मल एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे स्टीव्ह हफ यांनी सुशांतच्या साधल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी सुशांतशी बोलतानाचा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये या व्हिडिओंना ६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. स्टीव्ह हफबद्दल जाणून घेऊ.. सुशांतच्या आत्म्याशी बोलण्याच्या दाव्यात किती सत्यता? अनेकजणांना यात सत्यता किती असा प्रश्न पडला आहे. काही लोक अशा पद्धतींवर विश्वास ठेवतात तर काहींसाठी ही निव्वळ आहे. स्टीव्ह हफ यांचं स्वतःची अशी फॅन फॉलोविंग आहे. त्यांनी दावा केला आहे की, सुशांतशी बोला असं स्टीव्ह यांना अनेकांनी सांगितलं म्हणूनत्यांनी हा निर्णय घेतला. आता हफ यांनी सुशांतशी बोलल्याचा दावा केला यावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांच्या या बोलण्यात कोणतीही नवीन गोष्ट समोर आली नाही. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात जे प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यातील एकाही प्रश्नावर उत्तर या बोलण्यातून मिळत नाही. हफ म्हणाले की, त्यांनीयासंदर्भात सुशांतला अनेक प्रश्न विचारले. पण सुशांतच्या आत्म्याने कोणतंही उत्तर दिलं नाही. का मिळाली नाहीत उत्तरं? सुशांतच्या आत्म्याने हफला उत्तरं का नाही दिली याबद्दल स्पष्टीकरण देताना त्याने यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटलं की, मला याचा १० वर्षांचा अनुभव आहे. या अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो की, आत्मा अशा प्रकारच्या गोष्टी बोलत नाहीत. तसेच त्यांना सगळ्याच गोष्टी आठवतात असं नाही. यासोबतच हफ यांच्या अनुभवानुसार आत्मा माणसाच्या उर्जेचं प्रतिरूप आहे. पण ते भौतिक स्वरुपात नसतात. याआधीच्या त्यांच्या अनेक व्हिडिओमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की, आत्मा स्पष्ट शब्दात काही सांगत नाही. त्यामुळे त्यांच्या भोवतीची जी रहस्य असतात ती बहुतांश वेळा तशीच राहतात. १० वर्षांहून जास्तीचा अनुभव असणाऱ्या हफ यांनी हॉलीवूड अभिनेते रॉबिन विलियम्स, मायकल जॅक्सन आणि वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या आत्म्याशीही ते बोलले आहेत. भारतीय तज्ज्ञांनीही सुशांतशी बोलण्याचे केले अनेक दावे फक्त स्टीव्ह हफ हे एकटेच नाहीत ज्यांनी आतापर्यंत सुशांतशी बोलण्याचा दावा केला. अनेक भारतीय पॅरानॉर्मल तज्ज्ञांनीही असे दावे केले आहेत. फक्त पॅरानॉमलच नाही तर अनेकज्योतिष, टॅरो कार्ड रिडर आणि काउन्सिलर यांनी सुशांत संबंधिचे असे दावे यापूर्वी केले आहेत. पण कोणत्याही दाव्यात सुशांतच्या मृत्यूसंबंधीच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30PryNU